पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यात रोमहर्षक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया सिडनीला पोहोचली आहे. येथे २७ ऑक्टोबरला संघाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी नेटमध्ये जोरदार सराव केला. याशिवाय संघातील काही खेळाडू सराव करताना दिसले नाहीत. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि संघाचे तीनही स्टार वेगवान गोलंदाज सराव सत्राला अनुपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाचा नायक विराट कोहली किंवा त्याऐवजी चेस मास्टर कोहली यानेही फलंदाजीचा सराव केला. त्याचवेळी, गेल्या सामन्यानंतर टीका होत असलेल्या राहुलने सराव सत्रात अनेक मनोरंजक फटके मारले. याशिवाय पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक एक धावा काढून बाद झाला. अश्विन आणि चहलने आणि राहुलला सराव करायला लावला. कार्तिकने फलंदाजीच्या सरावाबरोबर थ्रो डाऊनचाही सराव केला. हे संपूर्ण सराव सत्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्या देखरेखीखाली पार पडले.

टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी

भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला असला तरी काही समस्या आहेत ज्या सतत संघासाठी अडचणी निर्माण करत आहेत. त्यापैकी सर्वात मोठा मुद्दा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीचा आहे. केएल राहुलनेही मागील काही मालिकांमध्ये काही उत्कृष्ट खेळी खेळल्या होत्या परंतु रोहितच्या बॅटमधून एक शानदार खेळीची चाहते वाट पाहत आहे. पाकिस्तानविरुद्धही आघाडीची फळी खराब झाली. ३१ धावांवर ४ खेळाडू बाद झाले. एकमेव डावखुरा फलंदाज असलेला अक्षर पटेलही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला. अशा स्थितीत नेदरलँडविरुद्ध संघाला या त्रुटी दूर करायच्या आहेत.

हेही वाचा :   T20 World Cup: क्विंटन डी कॉक एका चुकीने झिम्बाब्वेला मिळाल्या फुकटच्या पाच धावा, काय सांगतो आयसीसीचा नियम जाणून घ्या

हा खेळाडू सरावाला का पोहोचला नाही?

टीम इंडियाने सिडनीमध्ये त्यांच्या सुपर-१२ च्या दुसऱ्या सामन्यापूर्वी सराव सत्रात भाग घेतला. हे पहिलेच सत्र होते आणि सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे खेळू शकले नाहीत. या पाच खेळाडूंनी विश्रांती घेतली. भुवी आणि शमीने कसून गोलंदाजी करत प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसरीकडे हार्दिक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी ३ बळी घेत सर्वोत्तम गोलंदाजी केली. आता स्पर्धेपूर्वी मोठे डोकेदुखी म्हणून समोर ठाकलेली ती म्हणजे भारतीय गोलंदाजी असून मागील सामन्यातील सातत्य टीम इंडियाचे गोलंदाज ठेवतात का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.  

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ned t20 world cup team indias warm up session in sydney with pandya hitting the sticks know why avw