Arshdeep Singh Wickets Video: आयसीसी टी २० विश्वासचषकात भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने आपला आशिया चषकातील बदला पूर्ण केला आहे. आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कॅच सोडल्याने अर्शदीप प्रचंड ट्रोल झाला होता, अनेकांनी त्याला खलिस्तानी म्हणत हिणवले होते पण आज हाच अर्शदीप भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हिरो ठरला आहे. मुख्य म्हणजे हा अर्शदीपचा पहिलाच आयसीसी विश्वचषक आहे. विश्वचषकातील अर्शदीपच्या पहिल्याच षटकातील पहिल्याच बॉलवर त्याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याला तंबूत धाडले. यापाठोपाठ त्याने पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर व टी२० टॉप फलंदाज मोहम्मद रिझवानलाही बाद केले आहे . अर्शदीपच्या या आक्रमक गोलंदाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाबर आझम एक चेंडूही टिकू शकला नाही. अर्शदीपचा कमाल स्विंग पाकिस्तानच्या कर्णधाराला कळण्याच्या आधीच पंचांनी बाद दिले होते. पंचानी बाबर आझमला आऊट घोषित केल्यावर पाकिस्तानकडून रिव्ह्यू घेण्यात आला होता मात्र थर्ड अंपायरने सुद्धा भारताच्या बाजूने निर्णय देत बाबर आझमला बाद ठरवले. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात अर्शदीपने भारतासाठी दोन मोठ्या विकेट मिळवून दिल्याने संघाचा आत्मविश्वास आणखीनच बळावला आहे.

अर्शदीपने बाबर आझमला धाडले माघारी

https://twitter.com/Ambuj_jiii/status/1584095413585711105

मोहम्मद रिझवान विकेट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शेवटच्या षटकात अर्शदीपने आसिफ अलीचा एक अगदी सोप्पा झेल सोडला होता आणि हीच विकेट पुढे भारताला महाग पडली. रोहित शर्मा सुद्धा अर्शदीपवर चिडला होता, मात्र ट्रोलिंगनंतर टीम इंडियाने अर्शदीपची पाठराखण केली होती. अर्शदीपवर विश्वास ठेवून त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले होते हा विश्वास आता अर्शदीपने सार्थ ठरवला आहे.