टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमध्ये खेळवला जात आहे. सामन्याची नाणेफेक झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने या सामन्याला सुरूवात करणार आहे. या सामन्यासाठी अनेक दिग्गज खेळाडू नासाऊ काऊंटी स्टेडियमवर पोहोचले आहेत. पण वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने सर्वांच लक्ष वेधलं आहे. ख्रिस गेलने या सामन्यासाठी खास पेहराव केला आहे. यासोबतच त्या खास पेहरावातील लक्षवेधक जॅकेटवर दोन्ही संघांच्या खेळाडूंचे ऑटोग्राफ घेताना दिसला.
ख्रिस गेलने या सामन्यासाठी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. यावर जॅकेट घातलं आहे. या जॅकेटच्या हातावर एका बाजूला भारताचा तिरंगा आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या झेंड्याच्या फक्त हिरवा रंग आहे. गेल भारताच्या तिरंग्याच्या बाजूला भारतीय संघातील खेळाडूंचा ऑटोग्राफ घेताना दिसला. यादरम्यान रोहितची गळाभेट घेतली, तेव्हा गेलचा पोशाख बघून रोहितही त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसला. तर पाकिस्तानचा झेंडा आहे त्याबाजूला पाकिस्तानच्या खेळाडूंचा ऑटोग्राफ घेताना दिसला.
Chris Gayle & Virat Kohli playing football ??#INDvsPAK pic.twitter.com/iUVFWk25hj
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 9, 2024
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तानः मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद आमिर.