IND vs PAK Highlights, Wasim Akram: न्यूयॉर्कमधील वेस्टबरी येथील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी २० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला भारतासमोर गुडघे टेकावे लागले. या पराभवानंतर पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी संघावर टीका केली आहे. शोएब अख्तरने पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं की, “मला आता ‘निराश आणि दुखावलेला’ असं एक ऑटोमटेड कॅप्शनच करून घ्यायला हवं.” तर दुसरीकडे वासिम अक्रमने सुद्धा पाक खेळाडू हे ‘खेळाविषयी जागरूक’ नसल्याचे म्हणत सुनावलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील हायलाईट्स व पराभवानंतर माजी पाकिस्तानी खेळाडूंनी कुणाला दोष दिला ते आता आपण पाहूया..

बुमराहचा खेळ शहाणपणाचा आणि रिझवानला..

१२० धावांच्या क्षुल्लक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला १४ षटकांनंतर ८० – ३ अशी मजल मारता आली होती पण त्याआधी बुमराहने पाकिस्तानच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवानला ३१ धावांवर बाद केले. रिझवानच्या विकेटबद्दल वासिम अक्रमने इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “पाकिस्तानचे काही खेळाडू १० वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत, त्यांना मी आता शिकवू शकत नाही. पण रिझवानला खेळाबाबत अजिबात जागरूकता नाही. बुमराहला विकेट घेण्यासाठी चेंडू देण्यात आला होता आणि सावधपणे खेळणे हेच शहाणपणाचे ठरले असते हे त्याला माहीत असावे. पण रिझवानने मोठा फटका मारला आणि त्याची विकेट गमावली”.

IND vs NZ Ahmed Shehzad's dissects India's loss vs New Zealand at Pune test match
IND vs NZ : ‘कागज के शेर घर में हुए ढेर…’, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने उडवली खिल्ली
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Rohit Sharma Statement on India Defeat Against New Zealand in Test Series Said We just didnt bat well enough IND vs NZ Pune
IND vs NZ: “…तर आता परिस्थिती वेगळी असती”, रोहित शर्माचे भारताने मालिका गमावल्यानंतर मोठे वक्तव्य, कोणावर फोडले पराभवाचे खापर?
PAK vs ENGPAK vs ENG Pakistan won the Test series at home after 3 years
PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनी मायदेशात जिंकली कसोटी मालिका, साजिद-नोमानच्या जोरावर इंग्लंडचा उडवला धुव्वा
afghanistan emerging team
ACC Emerging Asia Cup: अफगाणिस्तानने युवा टीम इंडियाला दिला पराभवाचा धक्का; जेतेपदाचं स्वप्न भंगलं
IND vs NZ Sarfaraz Urges Rohit for DRS
IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
Rohit Sharma Statement on India Defeat Against New Zealand Said Games Like These Happen IND vs NZ
IND vs NZ: “पण आम्हाला ही अपेक्षा नव्हती…”, भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

पाकिस्तानला प्रशिक्षक नाही संघ बदलण्याची गरज..

दुसरीकडे,इफ्तिखार अहमदला लेग साइडला लागलेला एक शॉट माहीत आहे. तो वर्षानुवर्षे संघाचा भाग आहे पण फलंदाजी कशी करावी हे त्याला माहीत नाही. आता इतक्या वर्षांनी मी जाऊन फखर जमानला खेळाबाबत जागरूक कसं राहायचं हे सांगू शकत नाही. पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर प्रशिक्षकांना काढून टाकले जाईल आणि त्यांना काहीही होणार नाही. प्रशिक्षक ठेवण्याची आणि संपूर्ण संघ बदलण्याची हीच वेळ आहे.

बाबर आणि आफ्रिदीला घरी बसवा!

वासिम अक्रमने बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातील समीकरणाविषयी सुद्धा थेट भाष्य केलं आहे. “पाकिस्तानच्या कर्णधार पदात बदल झाल्यापासून आफ्रिदी आणि बाबर एकमेकांशी बोलत नाहीत. पण हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे इथे तुम्हाला देशासाठी खेळायचं असतं ते जमत नसेल तर या खेळाडूंना घरी बसवा”, असे अक्रम म्हणाला.

हे ही वाचा<< मोहम्मद सिराजच्या आक्रमक थ्रोचा रिझवानच्या हाताला फटका, दुखरा हात घेऊन रिझवान उठताच मैदानात काय घडलं पाहा, Video

दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत सांगायचं तर, पुरुषांच्या T20 विश्वचषकात यशस्वीपणे बचावलेली ही दुसरी-सर्वात कमी धावसंख्या होती. भारताच्या सहा धावांनी मिळवलेल्या विजयाने २०२२ च्या उपविजेत्या पाकिस्तानला गट-स्टेजमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आणले आहे.