20 World Cup 2024 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकात ९ जून रोजी सामना होणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला भारताला एकदाच हरवता आले आहे. टीम इंडियाला हा पराभव २०२१ विश्वचषकात पत्करावा लागला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. या कारणास्तव, चाहते आयसीसी स्पर्धेमध्ये होणाऱ्या सामन्यांबद्दल खूप उत्सुक आहेत. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत पाकिस्तान सामन्यात खेळपट्टी कशी असेल?

टी-२० विश्वचषक २०२४ मधील खेळपट्टीची सर्वाधिक चर्चा होत आहे. नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ‘ड्रॉप इन पिच’ या खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आला आहे. येथे भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला आहे. यापूर्वी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ येथे खेळले होते. खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अवघड आहे. फलंदाज जखमी होत आहेत. वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येते. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातही असेच काही घडू शकते.

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजता सुरू होईल. तत्पूर्वी दोन्ही संघांतील कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडेल. भारतीय लोकांना वर्ल्ड कप मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईल आणि टॅबलेट वापरकर्ते डिस्ने हॉटस्टार ॲपवर लाइव्ह सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतील.

हेही वाचा – USA vs PAK : १४ वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण! पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर सौरभवर भारतीय चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव

८.५ लाख रुपयांपर्यंतचे तिकीट –

भारत-पाकिस्तान सामन्याचे सामान्य तिकीट किंमत $300 (रु. 25 हजार) आहे तर प्रीमियम तिकिटाची किंमत $2,500 ते $10,000 (रु. 2 लाख ते ८.५ लाख) दरम्यान आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या दक्षिण आशियाई समुदायासाठी ही किंमत खूप जास्त आहे. युनायटेड स्टेट्समध्ये राहणारे आणि अमेरिकन क्रिकेटचे वार्तांकन करणारे पत्रकार पीटर डी ला पेन्ना यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, एका सामन्यासाठी $350 देऊनही, त्यांना सावली नसलेली जागा प्रीमियम सीट म्हणून मिळाली.

हेही वाचा – USA vs PAK : ‘गोल्डन डक’वर आऊट झाल्यानंतर आझम खान संतापला, चाहत्यांशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल

भारत-पाक सामन्याचे तिकीट कसे खरेदी करावे?

भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी, तुम्हाला टी-२० वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइट विंडो उघडल्यानंतर आणि तिकीट बुकिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला स्थान निवडावे लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नासाऊ क्रिकेट स्टेडियममध्ये होणार असल्याने तुम्हाला या स्टेडियमच्या नावावर क्लिक करावे लागेल. ठिकाण निवडल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना निवडा. तिकिटांची संख्या सेट केल्यानंतर, तुम्हाला फक्त पेमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला ई-मेलद्वारे तिकिटे मिळतील.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak match t20 world cup 2024 date time venue pitch report live streaming tickets book and other key details vbm