रविवारी (२३ ऑक्टोबर रोजी) टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली. अंत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला अगदी शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं. मात्र हा पराभव पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंना अजूनही मान्य करता आलेला नाही. त्यामुळेच आपल्या संघाची बाजू घेताना काहीजण अगदीच बालीश आणि हस्यास्पद विधाने करत आहेत. सामन्यामधील शेवटच्या षटकामध्ये नो-बॉल, फ्री हीट, स्टम्पिंगसारखे वाद निर्माण झाले. यावर दोन्हीकडील चाहत्यांनी आपआपल्या पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवल्या. मात्र पाकिस्तानचे माजी खेळाडू आकिब जावेत आणि मोईन खान यांनी तर स्वत:च्या संघाची बाजू घेताना हद्दच ओलांडली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या दोघांनी केलेल्या विधानासंदर्भात वाचून तुम्ही सुद्धा क्लीन बोल्ड व्हाल.

नक्की वाचा >> T20 World Cup: “विराटने टी-२० मधून निवृत्त व्हावं कारण…”; भारताच्या विजयाचं विश्लेषण करताना शोएब अख्तरचं विधान

मेलबर्नच्या मैदानावर ९० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यातील नाणेफेक झाली. नाणेफेक रोहितने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक करताना नाणं रोहितनेच हवेत उडवलं होतं. नाणं उडवताना रोहितने थोडं उंच उडवल्याचा आणि नाणं दूरवर पडेल अशापद्धतीने उडवल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी खेळाडू असणाऱ्या आकिब जावेद आणि मोईन खान यांनी केला आहे. ‘जीओ सुपर’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात या दोघांनी अजब चर्चा केली असून या चर्चेमुळे हे दोघं ट्रोल होत आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’

या चर्चेमध्ये आकिब जावेदने, “अरे नाणेफेक होण्याआधी नाणं केवळ पंचांनी पाहिलं. जेव्हा पंचांनी नाणेफेक करण्यास सांगितलं तेव्हा रोहितने सीमारेषेजवळून चेंडू फेकावा त्या पद्धतीने नाणं हवेत उडवलं. जिथं नाणं पडलं ते दिसतही नव्हतं. तर कसं कळणार छापा पडला की काटा?” असं विधान केलं. पुढे आपलं हे अजब तर्क लावताना आकिबने, “नाणेफेक झाल्यानंतर पंच रोहित शर्माजवळ गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नाणेफेक जिंकला आहात. खरं तर हा फार गंभीर मुद्दा आहे. कर्णधार नाणेफेक करण्यासाठी स्वत: का जातो तर त्याला स्वत:ला नाणं पाहून काटा पडला आहे की छापा कळावं म्हणून. तुम्ही नाणेफेक नीट पाहा रोहित शर्मासमोर कार्पेट होतं मात्र त्याने नाणं मुद्दाम दूर फेकलं,” असाही दावा केला. “रोहितने टॉसदरम्यान मुद्दाम नाणं उंच उडवत लांब फेकलं आणि त्यामुळे काटा पडला की छापा कळलं नाही,” असं आकिबचं म्हणणं होतं.

नक्की वाचा >> Ind vs Pak: “…तर भारताला विश्वचषक जिंकणं शक्य नाही”; रोमहर्षक सामना भारताने जिंकल्यानंतर इंझमाम-उल-हकचं विधान

खरं तर ऑस्ट्रेलियातील मैदानांवर नाणेफेक फार महत्त्वाची ठरत नाही. असं असतानाही पाकिस्तानला नाणेफेक जिंकायची इच्छा होती मात्र तसं घडलं नाही असं सूचक विधान आकिबने केलं. यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू मोइन खानने प्रतिक्रिया देताना बाबार आझम नाणेफेक जिंकला असता तर भारतीय संघाला १४० धावाही करता आल्या नसत्या. या विषयावर बोलताना मोईन खानने, “नाणेफेक फार महत्त्वाची ठरते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असती आणि भारताला पाहिल्या डावात मिळाली तशी खेळपट्टी मिळाली असती तर भारतीय संघाला १४० धावाही करता आल्या नसत्या,” असा दावा केला. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यामधील चर्चा…

नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

भारताने अगदी शेवटच्या चेंडूवर चार गडी राखून हा सामना जिंकला. पाकिस्तानने दिलेलं १६० धावांचं लक्ष्य भारताने शेवटच्या चेंडूवर गाठलं आणि स्पर्धेतील आपला पाहिलाच सामना जिंकला.

Story img Loader