T20 World Cup 2022 India vs Pakistan Weather Update: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धक पाकिस्तानशी भिडणार आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे रंगणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल केले जाऊ शकतात अशी माहिती रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दिली होती. भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या संघानेही सराव सत्रात बरीच मेहनत घेतली आहे, मागील काही मालिकांमधील पाकिस्तानचा खेळ पाहता आजचा सामना नक्कीच अटीतटीचा ठरू शकतो. पण भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांसमोर मूळ आव्हान हे निसर्गाचेच आहे. आजच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियातील हवामान कसे आहे जाणून घ्या..

Accuweather च्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांपासून येथे पाऊस पडला नाही. ऑस्ट्रेलियात सध्या वातावरण ढगाळ असून दुपारी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार जरी सामन्याच्या वेळी पाऊस पडला तरी त्यामुळे सामना रोखण्याची वेळ यावी इतका जोर नसेल. रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता ४० टक्के असून आकाश ९२% ढगाळ असू शकते, वाऱ्यांचा वेगही ४५ किमी/ताशी इतका असेल. मेलबर्नमध्ये कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….

T20 World Cup IND vs PAK: “आफ्रिदी आक्रमक आहेच पण त्याच्या…” तेंडुलकरने टीम इंडियाला सांगितलं यशाचं गुपित

दरम्यान, रोहित शर्माने पावसामुळे सामन्यावर परिणाम होणार का यावरही कालच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. रोहितने सांगितले की येथे नाणेफेक खूप महत्त्वाची असेल. “मेलबर्नचे हवामान बदलते. खरंच माहीत नाही की पुढे काय होणार आहे. ४० षटकांचा पूर्ण खेळ लक्षात घेऊन आम्ही मैदानात उतरू, पण त्यापेक्षा कमी खेळ झाला तरी आम्ही त्यासाठीही तयार आहोत.”

Video: फॅन्सचं प्रेम, कोहलीला अडथळा; विराटने विनंती करूनही चाहते ऐकले नाहीतच उलट…

आजचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर, लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.