भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं डावाची सुरुवात केली. मात्र, एक ओव्हर झाल्यानंतर पावसानं पुन्हा सुरुवात केली.भारताचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले आहेत. विराट कोहलीनं ४ तर रोहित शर्मानं १३ धावा केल्या. विराट कोहलीला सलामीला पाठवण्याची भारताची रणनीती यशस्वी होत नसल्याचं पाहायला मिळालं. हे दोन्ही फलंदाज आयपीएल स्पर्धेत चमकले होते. त्यामुळे या दोघांनी टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ओपनिंग करावी अशी अनेकांची मागणी होती. त्याप्रमाणे या वर्ल्डकप स्पर्धेत प्रयोग करण्यात आला. विराट कोहली आणि रोहित शर्मा काही खास सुरुवात करून देऊ शकले नाहीत.
भारतासाठी फलंदाजीची सुरुवात करताना, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने महत्त्वपूर्ण नाणेफेक जिंकून भारतीयांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर कोहली आणि शर्मा यांनी पाकिस्तानच्या जबरदस्त वेगवान आक्रमणाचा सामना केला. रोहितने भारतासाठी चांगली सुरुवात करत शानदार षटकारासह ८ धावा केल्या मात्र, एक ओव्हर झाल्यानंतर पावसानं पुन्हा सुरुवात केली.भारताचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले आहेत. मॅच पुन्हा सुरू झाल्यानंतर लगेचच कोहली नसीम शाहच्या गोलंदाजीवर चौकार मारून बाद झाला. पावसाच्या व्यत्ययानंतर लगेचच दुसऱ्या षटकात भारताला हा धक्का बसला. यावर आता क्रिकेटचे चाहते सोशल मीडियावर चर्चा करताना खिल्ली उडवताना तर सल्ला देताना दिसत आहेत. चला तर मग पाहूया व्हायरल होणारे काही गंमतीशीर मीम्स.
पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी चांगलाच वेळ घालवला आहे
“काय राव अजून थोडं थांबला असता”
हेही वाचा >> Mohammad Rizwan: घरच्यांचा विरोध पण तो ८ वर्ष थांबला अन्…, मोहम्मद रिझवानची लव स्टोरी ऐकून व्हाल अवाक्
चाहत्यांनी कोहली आणि रोहितला त्यांच्या खेळीवरून ट्रोल केले आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील वैर नवीन नाही. मैत्रीसाठी कितीही हात पुढे केले, तरी खेळाच्या मैदानावर या दोन्ही देशांचे खेळाडू जीव तोडून खेळतात. मग तो खेळ कोणताही असो आणि त्यात हा सामना क्रिकेटचा असेल, तर एखाद्या युद्धाप्रमाणे वातावरण निर्माण झालेले असते. चाहत्यांमध्ये तर वेगळीच चुरस आणि चढाओढ रंगते. त्यामुळेच खेळाडूंवरही कमालीचे दडपण येते.