माजी कर्णधार विराट कोहलीने केलेली निर्णायक खेळी, हार्दिक पंड्याचं अष्टपैलू योगदान आणि त्यापूर्वी युवा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगने केलेला भेदक मारा तीन गोष्टींच्या जीवावर भारतीय संघाने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ केला. रविवारी ‘अव्वल १२’ फेरीच्या थरारक सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार गडी राखून सरशी साधली. या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये म्हणजेच भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या वेळेस सामन्याचा हिरो ठरला अर्शदीप. खरं तर अर्शदीपला मागील काही महिने हे फारच चढ उतार असणारे गेले.

नक्की वाचा >> Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’

टी-२० आशिया चषक स्पर्धेमध्ये त्याने आसिफ अलीचा झेल सोडला होता. त्यानंतर आसिफनेच पाकिस्तानला भारताविरोधात विजय मिळवून दिला होता. या पराभवानंतर अर्शदीपला भारतीय चाहत्यांनी बरंच ट्रोल केलं होतं. काहींनी तर अगदी टोकाची भूमिका घेत खलिस्तानी वगैरे टीकाही केली होती. या कामगिरीचा वचपा अर्शदीपने पाकिस्तान विरुद्धच्या विश्वचषकाच्या सामन्यात काढला. आपल्या चार षटकांमध्ये अर्शदीपने ३२ धावा देत चार फलंदाज बाद केले. अर्शदीपने बाद केलेल्या तीन फलंदाजांमध्ये टी-२० क्रिकेटमधील सध्याचा अव्वल फलंदाज मोहम्मद रिजवान आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश होता. आझमला तर पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने पायचित केले. बाबर आझमला भोपळाही फोडता आला नाही. अर्शदीपने भारताच्या विजयामध्ये मोलाची भूमिका पार पाडला.

नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू

अर्शदीपच्या या कामगिरीमुळे त्याचे आई-वडील फारच समाधानी आहेत. अर्शदीपची आहे बलजीत कौर आपल्या मुलाची गोलंदाजी फारच क्वचित पाहते. बलजीत कौर यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यामागील कारण सांगितलं आहे. जेव्हापासून मुलगा भारतीय संघासाठी खेळू लागला आहे तेव्हापासून आपण त्याची गोलंदाजी पाहत नाही असं बलजीत कौर सांगतात. सामना सुरु असताना बलजीत या गुरुद्वारेत असतात किंवा गुरुनानक देव यांच्या फोटोसमोर प्रार्थना करत असतात. बलजीत कौर यांनी, “तेव्हा तो पहिल्यांदा भारतीय संघासाठी खेळला तेव्हापासून मी हे करते. तो नेहमी सर्वात धोकादायक षटक फेकतो. मला खेळाबद्दल फार कळत नाही. मात्र फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर धावा काढताना मला पाहणं कठीण जातं. म्हणून मी तो गोलंदाजी करताना पाहतच नाही,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

सुमार कामगिरी झाली आणि मुलाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं की अर्शदीपच्या आई-वडीलांना फार त्रास होतो. अर्शदीपचे वडील दर्शन सिंग यांनी, “मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती (बलजीत) हे सारं मनावर घेते. इंटरनेटवर अर्शदीपविरुद्ध काही चुकीची गोष्ट लिहिल्याचं तिने पाहिलं तर ती रडते. मी तिला अनेकदा समजावून सांगितलं आहे की आपण हे सारं थांबवू शकत नाही,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> Ind vs Pak: चित्तथरारक विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”

अर्शदीपचे वडील टी-२० हा फलंदाजांचा फॉरमॅट असल्याचं सांगतात. सुरुवातीपासूनच हा फॉरमॅट फलंदाजांचा आहे असं माझं मत आहे. मी स्वत: एक गोलंदाज आहे. प्रत्येक दिवशी चांगली कामगिरी करता येत नाही. एखादा दिवस वाईट जातो, असं ते म्हणतात.