टी२० विश्वचषक२०२२ च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर केलेल्या दणक्यात विजयामुळे दिवाळीपूर्वी देशवासियांना नाचण्याची आणि फटाके फोडण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तानवरचा विजय किती खास आहे, याचा अंदाज एका व्हिडिओवरून लावता येतो. स्पोर्ट्स प्रेझेंटर जतिन सप्रू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर, श्रीकांत आणि अष्टपैलू इरफान पठाण दिसत आहेत.
टीम इंडियाने आज मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तानचा पराभव केला. “विराट कोहलीने कल्पनेपलीकडचा खेळ दाखवला, त्यामुळेच संघ जिंकू शकला.” अशा शब्दात कौतुक करत सुनील गावसकरांनी त्याचे कौतुक केले. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात सर्वजण शेवटपर्यंत स्क्रीनशी जोडलेले राहिले दिसले.
सुनील गावसकर यांनी कोहलीच्या फटक्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की,”अन्य फलंदाज विचार पण करू शकत नाही ते फटके विराट सहज मारतो. हरिस रौफचे चेंडू हे शाहीन आफ्रिदीपेक्षा खेळायला अवघड आहे. रौफ हा आफ्रीदिपेक्षा सरस गोलंदाज असून त्याला इतके सहज फटके मारणे सोपे नाही. पण त्याला विराटनं बँकफूटवरून पंचवर मारलेला षटकार त्याचा फलंदाजीचा दर्जा दाखवतो. त्या दोन षटकारांनी विराटचा दर्जा सिद्ध होता. विराटचा फिटनेस हा वाखाणण्यासारखा आहे. आणखी १५ षटकं खेळायची असती तरी तो खेळला असता. जेव्हा भारतीय संघ चार गडी बाद झाल्यानंतर अडचणीत आला होता तेव्हा त्याने आणि हार्दिकने एकेरी-दुहेरी धावांसोबत तीन धावा पण अनेक काढल्या. यातूनच त्याचा फिटनेस गेम कसा पुढे न्यायचा हे त्याला नेमके कळते म्हणूनच त्याला चेज मास्टर म्हटले जाते.”
टीम इंडिया जिंकल्यावर केला आनंद साजरा
जतीन सप्रूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर भारताचा विजय होताच लहान मुलासारखे उड्या मारताना दिसत आहेत. दिग्गज सुनील गावस्कर यांच्या या आनंदातून भारताच्या विजयाचे महत्त्व कळू शकते.