भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. उभय संघांतील हा सामना रविवारी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. सामना पाहण्यासाठी एक लाख चाहते येणार असल्याचे सांगितले गेले आहे. पण या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याची शक्यता देखील आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामन्याच्या दिवशी पाऊस येण्याचा अंदाज ६० टक्के इतका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला तर काय होईल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
हवामानाच्या अंदाजानुसार, २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये पावसाची ७०-८०% शक्यता आहे आणि तो थांबण्याची शक्यताही कमी आहे. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यातील हा महान सामना रद्द होण्याचा धोका आहे. सध्या आयसीसीच्या नियमांवर एक नजर टाकूया आणि विश्वचषकात सामना रद्द झाल्यास काय होईल ते समजून घेऊया.
भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस आहे का?
आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम सामना वगळता विश्वचषकामधील साखळी सामन्यांसाठी कोणतेही राखीव दिवस ठेवलेले नाहीत. म्हणजेच सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना येथे १-१ गुण मिळतील. तथापि, आयसीसीच्या नियमांनुसार, कोणत्याही सामन्याचा निकाल लागण्यासाठी सामना किमान ५-५ षटकांचा असावा. याचा अर्थ असा की जर पाऊस थांबला आणि सर्व काही सुरळीत झाले, तर दोन्ही संघाना ५-५ षटकांचा सामना मिळू शकतो.
सामना रद्द झाल्याचा कोणाला होणार फायदा?
दोन्ही संघांना हा सामना रद्द व्हावा असे वाटत नसले तरी तसे झाल्यास बाद फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी हे गुण फरक करू शकतात. भारत आणि पाकिस्तानसह एकूण ६ संघ ब गटात असतील आणि यापैकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. हे लक्षात घेऊन, सर्व संघ जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा आणि चांगला निव्वळ धावगती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.