भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने भारताला पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवता आला. एकाद्या चित्रपटाचा क्लायमेक्स वाटावा अशी शेवटची ओव्हर या सामन्यात पडली. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. मात्र या षटकामध्ये हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकसारख्या दोन तगडे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही विराटने हुशारी दाखवत भारताला विजय मिळवून दिला. यापैकी एका चेंडूवर तर विराट बोल्ड झाल्यानंतरही तीन धावा पळाला आणि विजयाचं पारडं भारताच्या बाजुने झुकलं. मात्र विराट बोल्ड झाल्यानंतरही तीन धावा कशा पळाला हे मैदानामध्ये असलेल्या रोहितलाही पहिल्यांदा समजलं नाही. विराटने प्रसंगावधान दाखवत या तीन धावा घेतल्या त्या कशा आणि त्यामागील कारण काय ठरलं जाणून घेऊयात.

नक्की वाचा >> Ind vs Pak: थरार विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच हार्दिक पंड्या मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने एक धाव काढली. चार चेंडूमध्ये १५ हव्या असताना विराटने फलंदाजी करत होता. विराटने खणखणीत षटकार लगावला. मात्र हा षटकार लगावल्यानंतर त्याने चेंडू कंबरेच्यावर असल्याचा आक्षेप घेतला अन् विराटचा अंदाज बरोबर ठरला. हा बॉल नो बॉल देण्यात आला. त्यामुळे गणित तीन चेंडूमध्ये ७ धावा असं झालं. मोहम्मद नवाजने वाइड बॉल टाकल्याने तीन चेंडूंमध्ये सहा धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या.

पुढच्या चेंडूला विराट बोल्ड झाला. मात्र स्टम्पला बॉल लागला बेल्स पडल्या आणि पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास सोडण्याच्या तयारीत असताना विराट क्रिजमध्ये पळत धावा काढू लागला. एका बाजूने विराट आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक अशा दोन्ही वेगाने धावत धावा करणारे खेळाडू क्रिजवर असताना स्पीलमधून सीमारेषेकडे जाणारा चेंडू अडवून पुन्हा विकेटकिपरकडे येईपर्यंत दोघांनी तीन धावा घेतल्या होत्या. डगआऊटमध्ये रोहितलाही नेमकं काय चाललंय कळत नव्हतं. तो सुद्धा ‘क्या हुवा’ असं विचारत असल्याचं स्क्रीनवर पहायला मिळालं.

नक्की वाचा >> Ind vs Pak: अनुष्का शर्माच्या ‘त्या’ पोस्टला ४७ लाखांहून अधिक Likes; विराट कोहली ही कमेंट करत म्हणाला, “प्रत्येक क्षणी माझ्या…”

बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का धावला तर तो चेंडू फ्री हीट होता. मध्ये एक वाइड चेंडू पडल्याने फ्री इट पुढच्या चेंडूला कॅरी फॉरवर्ड झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांप्रमाणे नो बॉलच्या पुढचा चेंडू हा फ्री हीट असल्यावर त्यावर खेळाडू केवळ धावबाद गृहित धरला जातो. म्हणजेच फलंदाज बोल्ड झाला तरी त्याला बाद दिलं जात नाही. विराटने बोल्ड झाल्यानंतरी हा फ्री हीट असल्याचं डोक्यात ठेवत कार्तिकला तीन धावा धावण्यास भाग पाडलं. फ्री हीटचा चेंडू स्टम्पला लागल्यानंतर धावत केलेल्या धावा या बाईज म्हणजेच अतिरिक्त धावांमध्ये मोजल्या जातात. याच नियमांप्रमाणे पंचांनी या तीन धावा गृहित धरुन बाय घोषित केल्या.

नक्की वाचा >> …म्हणून पाकिस्तानी खेळाडूंनी पंचांना घेरुन वाद घातल्यानंतरही ‘तो’ चेंडू ‘डेड बॉल’ घोषित करण्यात आला नाही

फ्री हीटच्या चेंडूवर फलंदाज केवळ चार पद्धतीने बाद होऊ शकतो. पहिला म्हणजे त्याने चेंडूला हात लावला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने एकच चेंडू दोनदा बॅटने मारला, तिसरी गोष्ट क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा आणला किंवा फलंदाज धावबाद झाला तरच फ्री हीटवर बाद ठरतो. त्यामुळे विराट बोल्ड झाल्यानंतर सीमारेषेकडे जाणारा चेंडू अडवून तो क्षेत्ररक्षण करणाऱ्याने पुन्हा विकेटकीपरकडे फेकल्याने तांत्रिक दृष्ट्या चेंडू हा मैदानावरच म्हणजेच फिल्डवरच असल्याने तो डेड घोषित करण्यात आला नाही. या तीन धावा मिळाल्याने तीन चेंडूंमध्ये पाच धावावंरुन समीकरण दोन चेंडूंमध्ये दोन धावा असं झालं.

आता समीकरण होतं तीन चेंडू दोन धावा. कार्तिक फलंदाजी करत असतानाच मोहम्मद नवाजने त्याला यष्टीचित केलं. एका चेंडूत दोन धावा हव्या असताना अश्वीन फलंदाजीसाठी आला. अश्वीनला पहिलाच चेंडू वाईड टाकल्याने एका चेंडूत एक धाव गरजेची होती. पाकिस्तानी संघाचे सात खेळाडून सर्कलच्या आत असताना अश्वीनने हवेत फटका मारत भारताला विजय मिळवून दिला. विराटच्या प्रसंगावधानामुळे भारताला तीन धावा मिळाल्याने भारताचा विजय अधिक सोपा झाला. यासाठी विराटचं कौतुक होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak t20 world cup nawaz bowled kohli but india gets 3 byes run because it was free hit scsg