आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत-पाकिस्तान सामन्याला आज खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या षटकातचं, सुरेश रैनाने केलेली एक महत्वाची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने मागील दोन दिवसांपूर्वी एका न्यूज वेबसाईटशी बोलताना, भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला कोणता भारतीय गोलंदाज बाद करेल, याबाबत वक्तव्य केले होते. जे आज होत असलेल्या सामन्यात खरे ठरले आहे.
अर्शदीप सिंगने रैनाचे भाकीत खरे करुन दाखवले –
सुरेश रैनाने बाबरला आझमला अर्शदीप सिंग बाद करेल, असे भाकीत केले होते. ते भाकीत आज युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने खरे करुन दाखवले. अर्शदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाबरला आझमला पायचित केले. त्यामुळे बाबर आझमला भोपळा ही न फोडता तंबूत परतावे लागले. यामुळे पाकिस्तानला खूप मोठा धक्का बसला.
मोहम्मद रिझवानलाही केले बाद –
या सामन्यात अर्शदीप सिंगने केवळ बाबर आझमलाच बाद केले नाही, तर त्याच्या दुसऱ्याच षटकात बाऊन्सरच्या जोरावर मोहम्मद रिझवानला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे पाकिस्तान संघाने ७ षटकांच्या समाप्तीनंतर २ बाद ४१ धावा केल्या आहेत.