मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी भारत आणि पाकिस्तानमधील रोमांचक सामना पाहून सर्वांच्या डोळांचे पारणे फिटले. टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील हा चौथा सामना होता, जो भारातने चार गडी राखून जिंकला. भारताला विजय मिळवून देण्यासाठी विराट कोहली सर्वात महत्वाच खेळाडू ठरला. त्याने या सामन्यात वादळी खेळी केली आणि विजय मिळवल्यानंतर तो खूप भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

आर. अश्विनने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव काढताच कर्णधार रोहित मैदानात धावत आला आणि त्याने विराट कोहलीला उचलून धरले. यातूनच भारतीय संघात किती एकी आहे हे दिसून येते. सामना संपल्यानंतर विराटला ज्यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ही तो खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी बोलताना विराट म्हणाला की,” पाकिस्तान विरुद्धचा विजय हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. २०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केलेली ७४ धावांच्या खेळीपेक्षा ही खेळी अधिक माझ्या जवळची आहे. कारण पाकिस्तानविरुद्ध खेळताना एक वेगळेच इमोशन असतात.”

सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाणने देखील त्याच्याशी खास चर्चा केली. त्यावेळी तो म्हणाला की, “ आम्ही संघात सगळे मनाने बांधले गेले असून पुढील काळातही असेच इमोशन राहावेत हीच सदिच्छा व्यक्त करतो.” तसेच, सामन्याविषयी बोलताना म्हणाला की,”हार्दिकने मला विश्वास दिला, विकेट्स सांभाळत आम्ही एकेरी-दुहेरी धाव काढत गेलो.”

हेही वाचा :  IND vs PAK Video: विराटच्या डोळ्यात अश्रू पाहताच रोहित शर्माने घेतली धाव; मैदानात उचलून घेतलं अन…

विराट कोहली पाकिस्तानच्या गोलंदाजी विषयी बोलताना म्हणाला की, “हरिस रौफच्या जे काही उरलेले षटके होती त्यात जर आपण मोठे फटके खेळले तरच सामना जिंकू शकतो असे आम्ही दोघांनी १८व्या षटकाआधी ठरवले होते. ठरवलेल्या प्लान नुसार आम्ही फाटके मारत गेलो.” रौफच्या षटकातील दोन षटकार हे माझ्या आयुष्यातील उत्कृष्ट अशा प्रकारचे होते. २८ धावा असताना जर दोन षटकार नाही मारले तर मात्र खूप अवघड परिस्थिती होईल, समोर मारलेला षटकार हा माझ्या आयुष्यातील खूप वेगळा अनुभव आहे. माझ्या कारकिर्दीत ३-४ वेळा असा फटका मारला गेला. पण त्यानंतर ज्यावेळेस शेवटच्या षटकात हार्दिक बाद झाला त्यावेळी थोडी गडबड झाली असे वाटले. कारण हार्दिक म्हणाला होता की, मी नवाजला शेवटच्या षटकात षटकार मारून सामना जिंकू पण तसे झाले नाही.”

हेही वाचा :   Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू

विराट कोहली जतीन सप्रूशी शेवटी चाहत्यांना म्हणाला की.” ही फक्त एक सुरुवात आहे मोठ्या सामन्यासाठी तुम्ही भलेही तयार असला पण ह्या भावना अशाच शेवटपर्यंत राहू द्या अशी चाहत्यांना विनंती करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. हे सगळं देवाने माझ्या हातून घडवून आणले.”  

Story img Loader