पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने भारताचा माजी कर्णधार आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विराट कोहलीसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. विराटने पाकिस्तानी संघाच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतल्यानंतर इंझमाम-उल-हकने विराटचं कौतुक करतानाच भारतीय संघ व्यवस्थापनाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. भारतीय संघ विराटशिवाय काहीच नाही असं मत इंझमाम-उल-हकने व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाकिस्तानविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर विराटचं कौतुक करताना इंझमाम-उल-हकने भारतीय संघाला आरसा दाखवण्याचंही काम केलं आहे. भारतीय संघ हा उत्तम आहे. तो सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्धांसाठी धोकादायक ठरु शकतो. मात्र या संघामध्ये केवळ विराट कोहलीच एकमेव खेळाडू आहे जो उत्तम खेळ करतोय, असं स्पष्ट मत इंझमाम-उल-हकने मांडलं.
सर्वाधिक धावा करणारे आणि सामना जिंकून देणारे असे दोन प्रकारचे फलंदाज असतात असंही इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे. “काही खेळाडूंनी धावा केल्या तरी आपल्या संघाला सामना जिंकवून देण्यात ते अपयशी ठरतात. मात्र असे काही खेळाडू आहेत जे आपल्या संघाला एकहाती सामना जिंकवून देण्याची क्षमता ठेवतात. विशेष म्हणजे तणाव असताना ते सामने जिंकून देतात. विराट हा तशाच प्रकारचा खेळाडू आहे. त्याचा दर्जाच वेगळा आहे,” असं म्हणत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने विराटचं कौतुक केलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak: चित्तथरारक विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”
विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीलाच कोहलीला लय गवसल्याने भारताला फायदा होणार असल्याचं सूचक विधानही इंझमाम-उल-हकने केलं आहे. “भारताची कामगिरी एकाच खेळाडूवर अवलंबून आहे आणि तो खेळाडू आहे विराट कोहली. विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता म्हणून भारतीय संघ मागील काही काळापासून वाईट कामगिरी करत होता. त्यामुळेच आता त्या लय गवसल्याने विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं पारडं अधिक जड झालं आहे,” असं इंझमाम-उल-हक म्हणाला.
विराट नसेल तर भारत विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा विचारही करु शकत नाही, असंही पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने म्हटलं आहे. “विराटला त्याची लय गवसली हे भारतीय संघाच्या दृष्टीने फारच चांगलं आहे. विशेष म्हणजे ही लय त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गवसली. तसं हे कोणत्याही सामन्यात होऊ शकलं असतं. मात्र हे घडलं पाकिस्तानविरुद्दच्या पहिल्याच सामन्यात. विराट आणि पंड्याने उत्तम पार्टनरशीप केली. पंड्या बाद झाल्यानंतरही कोहलीने धावगती कायम राखली आणि प्रेशर घेतलं नाही हे फार निर्णायक ठरलं. तो सेट बॅट्समन होता तरी त्याच्यावर प्रेशऱ होतं. मात्र शेवटच्या दोन षटकांमध्ये त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरुन त्याचा दर्जा वेगळा असल्याचं दिसून येतं. त्याने रौफला लगावलेले ते दोन षटकार दर्जेदार होते,” असं इंझमाम-उल-हकने सामन्याचं विश्लेषण करताना म्हटलंय. भारतीय संघाची धावसंख्या ३४ वर चार गडी बाद अशी असताना हार्दीक पंड्या आणि विराटने ११३ धावांची पार्टनरशीप केली. पंड्या ३७ चेंडूंमध्ये ४० धावा करुन बाद झाला. मात्र या पार्टनरशीपमध्येही कोहलीने ४१ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला. भारताने टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला चार गडी राखून पराभूत केलं.
नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू
“भारतीय संघ हा प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरु शकतो तो एकाच परिस्थिती जेव्हा विराट उत्तम खेळत असेल. मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतोय. या ठिकाणी अनेक गोष्टी विचारात घेण्याची गरज आहे. इतर लोक वेगळ्या फलंदाजांना धोकादायक मानत असतील मात्र मला विचारलं तर विराटच जबरदस्त आहे,” असं इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे.
इतकच नाही तर विराट पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला त्याचप्रमाणे खेळत राहिला तर भारताला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे असंही इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे. “विराटशिवाय विश्वचषक जिंकू शकतात असं त्यांना (भारताला) वाटत असेल तर ते शक्य नाही,” असंही इंझमाम-उल-हकने भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सामन्याचं विश्लेषण करताना म्हटलं आहे. इंझमाम-उल-हकने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ही विधानं केली आहेत.
नक्की वाचा >> Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’
भारताच्या विजयाचं सर्व श्रेय विराटलाच द्यायला हवं असंही इंझमाम-उल-हक म्हणाला. “विराट हा असा खेळाडू आहे ज्याला काहीही अशक्य नाही. तो फार उत्तम खेळला. तो एकटाच संघाला सामना जिंकवून देऊ शकतो. अशी क्षमता असणारे फारच कमी खेळाडू आहेत,” असं म्हणत इंझमाम-उल-हकने विराटचं कौतुक केलं.