T20 World Cup 2024, India vs Pakistan Highlights: पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी टी-२० विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानच्या सहा धावांनी झालेल्या पराभवावरून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावर कठोर टीका केली आहे. भारताला ११९ धावांवर रोखूनही विजय मिळवण्यात अयशस्वी झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताने दिलेल्या १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पाकिस्तान १२ षटकांनंतर २ बाद ७२ धावांवर चांगले खेळत होते, तेव्हा मोहम्मद रिझवान आणि फखर झमान क्रीजवर होते. पण त्यानंतर सामन्याचा रोख हळूहळू भारताच्या दिशेन वळला.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना वकार युनूस म्हणाले, “मला वाटते की भारताने खराब फलंदाजी करून पाकिस्तानला हा सामना जिंकण्याची चांगली संधी दिली. ते कदाचित १४०-१५० धावा सहज उभारू शकले असते. शेवटी त्या सात विकेट्स गमावल्याचा फायदा झाला नाही. भारत एक चांगला संतुलित संघ आहे. जर त्यांनी चांगली फलंदाजी केली नाही तर त्यांना माहित आहे की त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजासारखे गोलंदाज आहेत – त्यांच्याकडे त्यांची भक्कम गोलंदाजी बाजू आणि क्षेत्ररक्षण देखील आहे, ज्यामुळे ते एक परिपूर्ण टीम बनतात,”
“पाकिस्तान – जर तुम्ही हा सामना जिंकू शकत नसाल तर मी काय बोलू? हा विजय तुमच्यासमोर आयता दिला होता आणि पाकिस्तानने त्याचा फायदा करून घेतला नाही. पाकिस्तानी फलंदाजांची ही भयानक कामगिरी होती. सुरुवातीला काही भागीदारी झाल्या पण ते विजय मिळवू शकले नाहीत,” वकार पुढे म्हणाला.
जसप्रीत बुमराह विरुद्ध रिजवानच्या शॉट निवडीच्या निर्णयाबद्दल वकारने विशेषतः टीका केली, ज्यामुळे तो बाद झाला आणि खेळ भारताच्या बाजूने वळला. “सामना पाकिस्तानच्या हातात होता. मोहम्मद रिझवानचा तो शॉट खूपच सामान्य होता आणि जेव्हा तो तो शॉट खेळला आणि आऊट झाला तेव्हा मला माहित होते की काहीतरी मोठं घडणार आहे कारण आपल्याला बुमराह आणि सिराजची क्षमता माहित आहे,” तो म्हणाला.
महान डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही वकार युनूसच्या मतांना पाठिंबा देत म्हटले, “पाकिस्तानी खेळाडूंमध्ये खेळाबद्दल जागरूकता नसल्याचे दु:ख व्यक्त केले. “हे लोक १० वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत आणि मी त्यांना शिकवू शकत नाही. रिझवानला खेळाबद्दल जागरूकताच नाहीय. त्याला माहित असावे की बुमराहकडे चेंडू हा विकेट घेण्यासाठी देण्यात आला होता. त्यामुळे रिजवानने त्याच्या गोलंदाजीवर सांभाळून खेळलं पाहिजे होतं. पण रिझवानने मोठा फटका मारला आणि त्याची विकेट गमावली.”
हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल
“या खेळाडूंना घरी बसवा…” वकार-अक्रम यांनी पाकिस्तानी संघाचे वाभाडे काढले
अक्रमने फखर जमान आणि इफ्तिखार अहमद हे फलंदाज अनेक वर्षे संघात असूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याचे सूचित केले. “इफ्तिखार अहमदला लेग साइडवरील एक शॉट माहित आहे. तो अनेक वर्षांपासून संघाचा भाग आहे, पण फलंदाजी कशी करावी हे त्याला माहित नाही. मी जाऊन फखर जमानला खेळाबद्दल सांगू शकत नाही. पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की जर ते चांगले प्रदर्शन करत नाहीत, प्रशिक्षकांना काढून टाकले जाईल, आणि त्यांच्याबाबत कोणताच निर्णय होणार. पण आता वेळ आली आहे की प्रशिक्षकांपेक्षा संपूर्ण संघ बदलण्याची.”
या वर्षाच्या सुरुवातीला संघाचा कर्णधार बदलल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी एकमेकांशी बोलत नाहीत असे सांगून त्याने अंतर्गत मतभेद देखील उघड केले. “संघात असे खेळाडू आहेत जे एकमेकांशी बोलूही इच्छित नाहीत. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे आणि तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता. या खेळाडूंना खरंच घरी बसवा.