टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (९ नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला, जो पाकिस्तानने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत कशीबशी जागा मिळवली आणि आता उपांत्य सामना जिंकलत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडची मात्र पुन्हा एकदा निराशा झाली. पाकिस्तानच्या विजयात त्यांचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचे योगदान महत्वाचे राहिले.
सामना संपल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांनी त्याची स्टार स्पोर्ट्ससाठी छोटीशी मुलाखत घेतली. त्यात त्याला इरफान पठाणने त्याच्या या शानदार अर्धशतकी खेळीवर प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने तो व्यक्त होत झाला. रिझवान म्हणाला की, “ हे सर्वकाही अल्लाह आमच्याकडून करून घेतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वाईट काळ येत असतो. माझी आणि बाबरची फलंदाजी फारशी काही दिवस झाले फारशी चांगली होत नव्हती. पण महत्वाच्या सामन्यात आम्ही स्वतः वर विश्वास ठेवला आणि मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. आज दिवस आमचा होता. जगातील सर्वात मोठा फलंदाज विराट कोहलीला देखील या वाईट काळातून जावे लागले आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा या सर्वाचा अनुभव घेत यातून धडा घेण्याचा प्रयत्न करत आहोत.”
जतीन सप्रूने त्याला पाकिस्तानच्या सुपर -१२ मधील कामगिरीविषयी प्रश्न विचारला. त्यावर मोहम्मद रिझवानने उत्तर दिले “ भारताकडून जिंकलेला सामना हरल्यानंतर आम्हाला खूप दुखः झाले होते. नंतर आम्ही संघ म्हणून थोडे अपसेट होत गेलो. मग झिम्बाब्वेकडून पराभव झाल्यानंतर मात्र आम्हाला वाटले की आम्ही आता लवकर घरी जाणार पण मनात एक अशी शंका आली होती की १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकात देखील हीच घटना घडली होती. आताही तेच घडले. अल्लाह हे सर्व आपल्याकडून सर्व करून घेतो फक्त आपण मेहनत घेतली पाहिजे आणि नशिबाने साथ दिली पाहिजे जी नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवून आम्हाला दिली म्हणून आज आम्ही टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आहोत.”
आकाश चोप्रा आणि हरभजन सिंग यादोघांनीही त्याला प्रश्न विचारला. “बाबर, रिझवान आणि शाहीन आफ्रिदी तुमची तिकडी आता फॉर्ममध्ये आली आहे.” यावर त्याचे मत त्यांनी त्याला विचारले. रिझवान म्हणाला की, “ शाहीन आफ्रिदी आज खूप दिवसांनी लयीत गोलंदाजी करताना दिसला. तो पाकिस्तान संघाचा एक मोठा अॅसेट आहे. बाबर बाबतीतही त्याने विराट कोहलीचे उदाहरण देत तो किती मोठा फलंदाज आहे हे पटवून दिले. फॉर्म हा तात्पुरत्या स्वरुपात असतो तो येतो आणि जातो पण फलंदाजीतील क्लास मात्र कायम स्वरूपी असतो.” असे त्याने उत्तर दिले.
इरफान आणि जतीन यांनी त्याला जाता जाता एक प्रश्न विचारला की, “तुला भारतासोबत खेळायला आवडेल का इंग्लंड बरोबर? यावर त्याने कुठेही मागचा पुढचा विचार न करता भारत असे उत्तर दिले. जगात कुठेही क्रिकेटचा चाहता असो त्याला भारत-पाकिस्तान यांच्यातच सामना पाहायला आवडेल आणि मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की भारत देखील अंतिम सामन्यात मेलबर्नला खेळायला येईल.”