टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत आणि पाकिस्तान संघातील पहिला सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारताने विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या, जोरावर पाकिस्तानचा ४ विकेट्सने दारुन पराभव केला. या सामन्यात पाकिस्ताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ६ गडी गमावून १६० धावा करत विजय नोंदवला.

त्याचबरोबर विराट कोहलीने आज दाखवून दिले की, त्याला वर्ल्ड कपमध्ये का खेळवावं? तसेच त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात टीकाकारांना बॅटने चोख उत्तर दिले. विराटने ५३ चेंडूंचा सामना करताना, ६ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकाराच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाचा विजय सोपा झाला. आतापर्यंत विराट कोहली धावांचा पाठलाग करताना १८ वेळा नाबाद राहिला आहे. त्याचबरोबर भारताने हे १८ सामने देखील जिंकले आहेत. यावरुन अदाज लावता येईल की, विराट धावांचा पाठलाग करताना कोणत्या मानसिकतेने सामोरे जातो.

तत्पुर्वी सामन्याची नाणेफेक फेकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला धक्का कर्णधार बाबर आझमच्या रुपाने दुसऱ्या षटकात बसला. त्याला अर्शदीप सिंगने शून्य धावेवर तंबूत पाठवले.

शान मसूदने पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ५ चौकांराच्या मदतीने ५२ धावा चोपल्या. तसेच इफ्तिखार अहमदने देखील ५१ धावा केल्या. त्याने ३४ चेंडूचा सामना करताना, ४ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १५९ धावा करता आल्या.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. यामध्ये अर्शदीप सिंगने ३२ आणि हार्दिक पांड्याने २५ धावा दिल्या. त्याचबरोबर शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ८२ धावा केल्या. त्यापाठोपाठ हार्दिक पांड्याने देखील ३७ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. इतर भारतीय फलंदाजांना १६ धावांचा टप्पा करता आला नाही. पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना हरीस रौफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नसीम शाहने एक विकेट घेतली. हरीस रौफने ३६ आणि मोहम्मद नवाजने ४२ धावा दिल्या. तसेच नसीम शाहने २५ धावा दिल्या.

Story img Loader