टी-२० विश्वचषक २०२२ चा सुपर- १२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना इतका प्रेक्षणीय होता, ज्यासाठी शब्द कमी पडू शकतात. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चालला, जो भारताने जिंकला. रविवारी झालेल्या या ब्लॉकबस्टर सामन्याने दर्शकसंख्याचे सर्व विक्रम मोडीत काढले. हा शानदार सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर १८ दशलक्ष लोकांनी पाहिला.
हा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित झाला. स्टार स्पोर्ट्सवर हा सामना पाहणाऱ्या दर्शकांची संख्या एका आठवड्यानंतर टेलिव्हिजन दर्शकमापन संस्था ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बार्क) द्वारे प्रसिद्ध केली जाईल. परंतु डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारचे आकडे कंपनीने जाहीर केले आहेत.
डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रिमिंग दरम्यान दोन्ही संघांमधील आशिया कप २०२२ सामन्यादरम्यान नोंदवलेल्या 14 दशलक्षांपेक्षा अधिक दर्शक, टी-२० विश्वचषक २०२२ च्या सामन्यापेक्षा अधिक असल्याचे एका सूत्राने पीटीआयला सांगितले. या वेळी १८ दशलक्ष दर्शकांची संख्या एकाचवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान नोंदवली गेली आणि मागील रेकॉर्डला मागे टाकले.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सामन्याचा पहिला चेंडू टाकला, तेव्हा ३६ लाख लाइव्ह व्ह्यूज होते. पाकिस्तानचा डाव संपला तेव्हा ११ दशलक्ष दर्शक अॅपवर लाइव्ह होते. त्यानंतर डावाच्या विश्रांतीदरम्यान हा आकडा १४ दशलक्ष दर्शकांवर पोहोचला. भारताने जेव्हा धावांचा पाठलाग सुरू केला, तेव्हा एकूण ४ दशलक्ष दर्शकांनी सामना पाहण्यास सुरुवात केली. परंतु जेव्हा भारताने सामना जिंकला तेव्हा ही संख्या १८ दशलक्ष झाली.