Rishabh Pant becomes first Indian to get out on duck in T20 World Cup final : टी-२० विश्व २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतासाठी योग्य ठरला नाही. या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या ४,३ षटकात ३४ धावा करत तीन विकेट गमावल्या. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती, पण दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने दुसऱ्याच षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला बाद करत त्यांना अडचणीत टाकलं. यानंतर सूर्यकुमार यादवनेही फलंदाजी केली नाही आणि तो स्वस्तात बाद झाला. या दरम्यान ऋषभ पंतने एक नकोसा विक्रम केला.

टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय –

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऋषभ पंतने २ चेंडूंचा सामना केला आणि खातेही न उघडता बाद झाला. पंतला केशव महाराजने शून्यावर बाद केले. टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये शून्यावर बाद होणारा पंत हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंत प्रथमच शून्यावर बाद झाला. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने शून्य धावांवर विकेट गमावण्याची ही चौथी वेळ होती. पंत पहिल्यांदा टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झाला होता, तर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने या फॉरमॅटमध्ये दोनदा शून्यावर विकेट गमावली होती. आता तो प्रोटीजविरुद्ध शून्यावर बाद झाला.

Rishabh Pant vs Jasprit Bumrah funny video viral
Rishabh Pant : नेट प्रॅक्सिटदरम्यान लागली पैज; बुमराह झाला बॅट्समन, बॉलिंगला ऋषभ पंत, काय झालं पुढे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

कर्णधार रोहितने केल्या ९ धावा –

अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा लयीत दिसत होता आणि त्याने दोन चौकारांच्या मदतीने ९ धावा केल्या होत्या, परंतु केशव महाराजच्या एका चेंडूला स्वीप करण्याच्या प्रयत्नात तो हेनरिक क्लासेनकडे झेलबाद झाला. अंतिम फेरीत सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि तो मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण त्यानेही निराश होऊन कागिसो रबाडाच्या चेंडूवर क्लासेनकडे त्याचा झेल दिला. सूर्यकुमार यादवने ४ चेंडूत केवळ ३ धावांचा सामना केला.

हेही वाचा – IND vs SA Final: युनिव्हर्स बॉसचे विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘त्याला तुम्ही कमी…’

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले १७७ धावांचे लक्ष्य –

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि २ षटकार आले. तर अक्षर पटेलने ३१ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवम दुबेही शेवटी चमकला. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २७ धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ॲनरिक नॉर्किया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.