India vs South Africa T20 World Cup 2024 Final: टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. टीम इंडियाच्या विजयासोबतच भारतीय चाहते विराट कोहलीही फॉर्ममध्ये परतण्याची वाट पाहत आहेत. यादरम्यानच फायनलपूर्वी आयसीसीने विराट कोहलीचा किंग कोहली अवतारातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने विराट कोहलीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, यानंतर भारतीय चाहत्यांनीही त्याच्यावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर त्याने कमेंट पण डिलीट केली.

विराट कोहली टी-२० विश्वचषकात सलामीवीराच्या भूमिकेत आहे पण त्याचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय ठरला आहे. विराटने सात सामन्यांत कोहलीच्या बॅटमधून फक्त ७५ धावा आल्या आहेत. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याला काही सामन्यांमध्ये फक्त दुहेरी आकडा गाठता आला आहे त्याशिवाय एकदा कोहली गोल्डन डकवर बाद झाला.

हेही वाचा – IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

हेही वाचा – “तू आम्हाला शिकवू नकोस”, रोहितच्या ‘डोकं वापरा’ वक्तव्यावर इंझमाम उल हक भडकले; म्हणाले, “त्याला सांगा…”

विराट कोहलीची कामगिरी आणि त्याचा क्लास प्रत्येकाला माहित आहे. काही सामन्यांमध्ये धावा करण्यापासून तो चुकला असला तरी आतापर्यंतच्या त्याच्या अनेक ऐतिहासिक खेळी विसरून चालणार नाही. आयसीसीने सुद्धा विराटचा एक किंग कोहली अवतारातील फोटो शेअर केला आहे. कोहलीचे मागील विश्वचषकातील अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत. आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘राजाच्या मुकुटात एक हिरा अजून बाकी आहे. कोहली टी-20 विश्वचषक जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे.’ या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. विराटने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली आहे. परंतु त्याला अद्याप टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे आयसीसीने ही पोस्ट केली आहे.

हेही वाचा – “विराटबद्दल तर बोलूच नका…”, वर्ल्डकपमध्ये फॉर्मात नसलेल्या कोहलीवर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य, म्हणाले; “३-४ सामने”

इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने या पोस्टवर कमेंट केली आहे. कमेंट करताना त्याने लिहिले, ‘आयपीएल?’ स्टुअर्ट ब्रॉडने या कमेंटसह विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले कारण कोहली आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. ब्रॉडची ही कमेंट भारतीय चाहत्यांना आवडली नाही आणि त्यांनी कमेंट करून त्याने ब्रॉडला ट्रोल केले. चाहत्यांनी ब्रॉडला २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपची आठवण करून दिली, जेव्हा युवराज सिंगने त्याच्या षटकात सहा षटकार मारले होते. त्यानंतर ब्रॉडने ही कमेंट डिलीट केली पण तोपर्यंत स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.