IND vs SA Suryakumar Yadav Highlight: टी २० विश्वचषकातील भारताचा तळपता सूर्य (सूर्यकुमार यादव) आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा हुकुमी एक्का ठरत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार के. एल. राहुल, माजी कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सगळ्यांचे डाव फसले होते. भारताला ४९ वर ५ विकेटवरून सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिकच्या भागीदारीने शंभरीपार नेले. १०१ धावा पूर्ण होताच दिनेश कार्तिकही झेलबाद झाला होता मात्र सूर्यकुमार यादवने भारताचा खेळ उचलून धरला. टीम इंडियाने सूर्याच्या बळावर १३४ धावांचे टार्गेट दक्षिण आफ्रिकेला दिले आहे. सूर्यकुमारने आजच्या सामन्यात टी २० विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरु होण्याच्या आधीच इरफान पठाणने सूर्याला आपल्या तुफानी खेळीचे गुपित विचारले होते, यावेळी सूर्याने दिलेलं उत्तर खास ठरत आहे.
इरफान पठाणच्या प्रश्नाला उत्तर देताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, मी लहानपणी रबरी बॉलने खेळलो आहे. तेव्हा खेळताना खूपदा डोक्याला, पायाला लागलं आहे पण एकदा तुम्हाला लागलं की मग तो आत्मविश्वास स्वतःच येत जातो. सरावानेच खेळ सुधारतो. याशिवाय सूर्यकुमार यादवने यापृवी एका मुलाखतीत आपल्या खेळाचे श्रेय हे युट्युबला दिले होते. सूर्या म्हणाला की, मी युट्युबवर एक- दिवसीय, टी २०, टेस्ट क्रिकेटचे व्हिडीओ पाहत असतो. यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
ईएसपीएन क्रिकइन्फोला सूर्यकुमारने सांगितले की, २०१०- २०११ मध्ये मी मुंबई इंडियन्स मध्ये पदार्पण करताना युट्युब पाहण्याची सवय लागली होती. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये खेळाडू काय करतात हे मी लक्ष देऊन पाहायचो आणि त्याची अजूनही मला मदत होते.
सूर्यकुमार यादवची दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध कामगिरी
सूर्यकुमार यादवची टी २० मधील कामगिरी
PAK vs NED: बाबर आझम पुन्हा अपयशी; नेदरलँड विरुद्ध ९२ धावांचं लक्ष्य पण पाकिस्तानी कर्णधार..
दरम्यान, भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यातही सूर्यकुमार यादवने विराट कोहलीसह सुंदर पार्टनरशिप करून ३६० डिग्री खेळ दाखवला होता. सूर्याने अर्धशतक पूर्ण करून नेदरलँड विरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध आजच्या सामन्यात सूर्याने ४० चेंडूत ६८ धावा पूर्ण केल्या आहेत.