ICC T20 World Cup 2024 USA vs IND Updates: भारताने न्यूयॉर्कच्या काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात अमेरिकेचा ७ विकेट्सने पराभव केला. आदी अर्शदीपची गोलंदाजी आणि मग सूर्यकुमार यादवच्या संयमी अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर भारताने सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह भारतीय संघाने सुपर८ च्या फेरीत आपले स्थान पक्के केले. पण खेळपट्टीचे स्वरूप पाहता आणि अमेरिकेची भेदक गोलंदाजी पाहता भारतासाठी हा विजय सोपा नव्हता. पण संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला जीवदान मिळाल्याने तो शेवटपर्यंत मैदान टिकून राहिला आणि हा विजय संघ मिळवू शकला. सौरभ नेत्रावळकरने सूर्याचा झेल सोडला होता, आता सामन्यानंतर यावर उत्तर देताना सौरभ म्हणाला.
भारताच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर यजमान संघाला २० षटकांत केवळ ११० धावा करता आल्या. या छोटे लक्ष गाठताना भारतानेही तीन विकेट गमावल्या. अमेरिकेचा मराठमोळा गोलंदाज सौरभने एकेकाळी भारतीय खेळाडूंच्या हृदयाचे ठोके वाढवले होते. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने अनुभवी फलंदाज विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद केले. यानंतर तिसऱ्या षटकात सौरभने भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितला ६ चेंडूत केवळ ३ धावा करता आल्या. १० धावांवर भारताने दोन मोठ्या विकेट गमावल्या होत्या.
सौरभ नेत्रावळकरने सूर्याची कॅच केली होती ड्रॉप
रोहित-विराटची विकेट घेतलेल्या सौरभने मोठा झेल सोडला. सूर्यकुमार यादवने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर उभा असलेला सौरभ सोपा झेल टिपणार होत. पण सौरभने हा झेल सोडला आणि त्यामुळे सूर्यकुमार यादवला बाद करू शकला नाही. ज्याने नंतर भारतीय संघाला विजयापर्यंत नेले. सामना संपल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूने सौरभला हाच प्रश्न विचारला. तो म्हणाला, ‘मित्रा, तू एक इंजिनियर आहेस, तू गोलंदाजीही चांगली करतोस पण तू तुझा मित्र सूर्यकुमार यादवला बाद केलं नाहीस.’ यावर सौरभने देत सांगितले की, सूर्यकुमार यादवचा झेल सोडणं खूप महागात पडलं.
१३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने स्क्वेअर लेगवर चेंडू खेळला, नेत्रावळकर शॉर्ट थर्ड मॅनकडे धावला आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला पण हा झेल त्याला टिपला नाही. सूर्यकुमारने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सौरभचे कौतुक करताना सिद्धू म्हणाला, ‘तू शरीराने इथे आहेस, पण तुझा आत्मा मात्र भारतात आहे.’ यावर सौरभ म्हणाला; “हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय.”
सौरभ नेत्रावळकरने विराट कोहली आणि रोहित शर्माची विकेट घेत ऐतिहासिक कामगिरी केली. तर सामन्यानंतर बोलताना भारताच्या माजी खेळाडूंनी नवज्योत सिंग सिद्धू आणि हरभजन सिंग यांनी सौरभ नेत्रावळकरचे कौतुकही केले.