IND vs USA T20 World Cup 2024 Match: टी-२० विश्वचषकात आज म्हणजेच १२ जून रोजी भारत आणि अमेरिका यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. अमेरिकेचा संघ म्हणजे यातील निम्मे खेळाडू हे भारतीय खेळाडू आहेत किंवा मग भारतीय संघातून क्रिकेट खेळलेले आहेत. अमेरिकेच्या वर्ल्डकप संघातील तब्बल सात खेळाडू हे एकतर भारतात जन्मले आहेत किंवा तिथेच लहानाचे मोठे झाले आहेत. त्यापैकी दोन खेळाडू म्हणजे सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग यांनी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. फलंदाज मिलिंद कुमारने दिल्ली आणि सिक्कीमसाठी १०० हून अधिक प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए सामने खेळले आहेत. तर इतर खेळाडूंमध्ये डावखुरा फिरकीपटू नॉथुश केंजिगे, कर्णधार मोनांक पटेल, वेगवान गोलंदाज जसदीप सिंग आणि डावखुरा फिरकीपटू निसर्ग पटेल- भारतात क्लब क्रिकेट खेळले आहेत.
या भारतीय खेळाडूंनीही अमेरिकेला एक संघ म्हणून उभारण्यात मोठी भूमिका बजावली आहे. कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत करून या टी-२० विश्वचषकात अमेरिकेने आपले स्थान बनवले आहे. अ गटात अमेरिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहेत आणि वेस्ट इंडिजमधील सुपर८ साठी पात्र होण्याकरता त्यांना उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकणं आवश्यक आहे. भारतीय संघाविरूद्धचा त्यांचा सामना सोपा असणार नाही. भारतीय संघ हा मजबूत आणि टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार तर आहेच. पण अमेरिकेच्या संघातील या संघाकडून म्हणजेच भारताकडून एकेदिवशी खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. पण भारताविरूद्धचं ते सामना खेळताना दिसणार आहेत.
भारताविरूद्धच्या या सामन्यापूर्वी अमेरिकेचे खेळाडू हे भावुक झाले असून त्यांनी भारतीय संघाविरूद्ध खेळण्याच्या भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहूया नेमकं काय म्हणाले.
“युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये भारतीय संघाचे स्वागत आहे. जर आम्ही जर आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो, तर आम्ही आघाडीच्या क्रिकेटपटूंशीही स्पर्धा करू शकतो. त्यामुळे आम्ही एकावेळी एकच सामन्याचा विचार करण्याचा प्रयत्न करू आणि स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाने भारावून जाणार नाही. आम्ही शक्य तितकं वातावरण साधारण ठेवण्याचा प्रयत्न करू.,” असं सौरभ नेत्रावळकर म्हणाला.
“तुम्ही असंच काहीस स्वप्न पाहत असता आणि एक दिवस अचानक स्वतला रोहित शर्माशेजारी टॉससाठी उभे असलेलं पाहता. ही अवास्तविक गोष्ट आहे. हा खरंच एक मोठा दबावपूर्ण सामना असणार आहे. खरं सांगायचं तर आम्हाला आतापासूनच यावर फारसं लक्ष केंद्रित करायचं नाही. आम्हाला सर्व संघांविरूद्ध खेळायचं आहे.” असं गुजरातमध्ये जन्मलेला अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल म्हणाला.
हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द
“मोठा झाल्यावर मी रोहित शर्माकडे बघायचो. रोहित माझ्या शाळेतून आला आहे. जसा येईल तसा मी घेईन. संजू सॅमसन आणि कुलदीप यादव, मी त्यांच्यासोबत १९ वर्षाखालील भारतात खेळलो आहे. अक्षर पटेल, मी त्याच्यासोबतही खेळलो, त्यामुळे त्याला पकडणे आणि त्याच्याविरुद्ध खेळणेही मजेदार असेल,” हरमीत सिंग म्हणाला.
“मी लहानपणापासूनचं रोहित शर्माला बघत मोठा झालो आहे. रोहित आणि मी एकाच शाळेत होतो. संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांच्यासोबत मी १९ वर्षाखालील सामन्यांमध्ये भारताकडून खेळलो आहे. अक्षर पटेलसोबतही खेळलो. त्यामुळे या सर्वांना भेटणं आणि त्याच्याविरुद्ध खेळणंही मजेदार असणार आहे,” असं भारताकडून अंडर-१९ वर्ल्डकप खेळलेला हरमीत सिंग म्हणाला.
हेही वाचा – T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं
“जेव्हा आम्ही मोठे होत होतो तेव्हा भारताकडून एक दिवस खेळू अशी इच्छा मनात होती. परंतु परिस्थिती बदलली आणि आता आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळणार आहोत. पण मैदानावर, कोणीही मित्र नसतो. तुम्ही जिंकण्यासाठी तिथे उतरले असता,” असं मिलिंद कुमार म्हणाला.
“जेव्हा मी भारतात होतो, तेव्हा मला भारताची जर्सी घालायची होती, भारताकडून खेळायचं होतं. पण जसजसे मोठे झालो आणि आयुष्याने जसं वळणं घेतलं. त्यावरून मी दुसऱ्या देशात शिफ्ट झालो आणि आता पुढची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे भारताविरुद्ध खेळणे. एक लहान मुलगा जो वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत होता, त्याच्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जास्त काही नाही या सामन्यासाठी उत्सुक आहे,” असं नोशुथ केंजिगे म्हणाला.