आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने ७१ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने सुपर-१२ च्या टप्प्यातील दुसऱ्या गटात अव्वलस्थानी राहत संपवला. त्याचबरोबर भारतीय संघ आता उपांत्य फेरीत इंग्लंड संघासोबत भिडणार आहे. तत्पुर्वी आज झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने जसप्रीत बुमराहचा एक विश्वविक्रम मोडला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १० निर्धाव षटके टाकणारा भुवनेश्वर कुमार हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज आता भुवनेश्वर कुमार बनला आहे. जसप्रीत बुमराहने ६० सामन्यात ९ मेडन षटके टाकली आहेत, तर भुवीने ८४ व्या सामन्यात १० वे निर्धाव षटक टाकले आहे.
या टी-२० विश्वचषकात भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली आहे. भुवीने झिम्बाब्वेविरुद्ध भारताचे पहिले षटक टाकले आणि याच षटकात त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर या षटकात त्याने एकही धाव दिली नाही.
भारत उपांत्य फेरीत पोहोचला असून झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला आहे. हा सामना जिंकल्यामुळे १० नोव्हेंबरला उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. तसेत भारताच्या गटातून पाकिस्ताननेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे.