ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात सध्या भारत आणि झिम्बाव्बेमध्ये टी२० विश्वचषकातील ४२वा सामना खेळाला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या धमाकेदार फटकेबाजीमुळे भारताला १८६ पर्यंत मजल मारता आली. आजच्या सामन्यात के एल राहुल आणि सूर्यकुमारच्या खेळीमुळे सर्वच खुश झाले आहेत. मात्र याचदरम्यान दिनेश कार्तिकच्या जागेवर घेण्यात आलेल्या रिषभ पंतला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. यावरूनच नेटकऱ्यांनी पंतला आहे.
आजच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागेवर रिषभ पंत याला संघात जागा देण्यात आली आहे. रोहितने हा निर्णय घेतला. मात्र संधीचे सोने न करता पंत केवळ ३ धावा करून माघारी फिरला. याचाच राग आल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर रिषभ पंतला चांगलेच सुनावले आहे. यासंबंधीच्या मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस पडत आहे.
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या जोरदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये अनेक सामन्यांमध्ये जबरदस्त खेळी खेळली आहे. मात्र भारताच्या विश्वचषकातील मागील चार सामन्यांमध्ये पंतला बाहेर बसवण्यात आले होते. तथापि, आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश केला. यावेळी सर्वांच्याच नजारा पंतवर खिळल्या होत्या. शॉन विल्यम्सच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंतने चौकार मारला. मात्र, यावेळी रायन बर्ल याने धावत जाऊन हवेतच ही कॅच घेतली. रायनची आश्चर्यकारक कॅच सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिषभ या विश्वचषकातील पहिलाच सामना खेळात आहे. मिळालेल्या संधीचे सोने करत या सामन्यात तो चांगले प्रदर्शन करू शकला असता. मात्र, यावेळी तो केवळ ३ धाव करून बाद झाला. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी पंतविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
भारत विरुद्ध झिम्बाव्बे सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला घेण्याचे खास कारण सांगितले. रोहित म्हणाला की, “ऋषभ पंत हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याला संपूर्ण विश्वचषकात एकही खेळ खेळण्याची संधी मिळालेली नाही, आम्हाला त्याला ती संधी द्यायची होती म्हणूनच आज कार्तिकच्या ऐवजी ऋषभला प्लेइंग ११ मध्ये घेण्यात आले आहे.”