टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीमधील भारताचा शेवटचा सामना रविवारी झिम्बाब्वे विरुद्ध रंगणार आहे. प्रत्येक संघाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत उपांत्यफेरीमध्ये कोणता संघ जणार हे निश्चित नाही अशी ग्रुप टूची स्थिती असताना भारताला हा सामना जिकावाच लागणार आहे. उपांत्यफेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पाकिस्ताननेच गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीसाठीचं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…
विशेष म्हणजे झिम्बाब्वेच्या संघाने या मालिकेमध्ये पाकिस्तानला पराभूत करुन मोठा धक्का यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे वर वर लिंबू-टिंबू वाटणाऱ्या या संघाला हलक्यात घेणं रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला महागात पडू शकतं. सध्य स्थितीमध्ये पाकिस्तानचा नेट रन रेट हा भारतापेक्षाही सरस आहे. केवळ गुणांच्या आधारे भारत सध्या गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानी आहे. नेट रन रेटच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तानहून मागे आहे.
नक्की वाचा >> विराटने ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? भारताला बसणार का फटका?
भारत आणि झिम्बाब्वेचा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेदरम्यान अनेकदा मेलबर्लनमध्ये पाऊस पडला आहे. रविवारच्या सामन्याच्या दिवशीही दोन्ही संघांचं लक्ष आभाळाकडे असणार आहे. भारतीय क्रिकेट चाहते सुद्धा या सामन्यादरम्यान पाऊस पडला तर काय होणार याबद्दलची माहिती इंटरनेटवर सर्च करताना दिसत आहेत. मात्र दिलासा देणारी माहिती अशी आहे की रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही. अॅक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार रविवारी मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची शक्यता शून्य टक्के इतकी आहे.
नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय
अर्थात मेलबर्नवर ढगांची चादर दिसून येईल मात्र सायंकाळी ज्या वेळात सामना खेळवला जाणार आहे त्या वेळात पाऊस पडण्याची शक्यता अजिबात नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तरीही पाऊस पडला तर सामन्याचं काय होणार? पाऊस पडल्यास सामना अर्ध्यात सोडून देण्यात आला किंवा रद्द झाला तर नेट रन रेटचं गणित काय असणार? दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाणार का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. याच प्रश्नांची उत्तर पाहूयात…
नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?
पाऊस पडला तर काय होणार?
विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने सुपर १२ फेरीमधील सामन्यांसाठी एकही राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळेच भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानच्या सामन्याच्या दिवशी पाऊस झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण वाटून दिला जाईल. म्हणजेच भारताकडे सात गुण होतील आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. भारत थेट पात्र ठरेल अशासाठी कारण सध्या दुसऱ्या स्थानी असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तानने आपआपले सामने जिंकले तरी भारत पहिल्या दोन संघामध्ये सात गुणांसहीत जागा निश्चित करु शकतो.
नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण
दक्षिण आफ्रिकेने आपल्या उर्वरित सामन्यामध्ये नेदरलॅण्ड्सला पराभूत केलं तरी त्यांचे एकूण सात गुण होतील. म्हणजेच ते गुणांच्या बाबतीत भारताच्या बरोबरीला येतील. असं झाल्यास पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशला कशाही पद्धतीने पराभूत केलं तरी त्यांना दोन गुण मिळतील आणि त्यांचे एकूण गुण सहा होतील. म्हणजेच नेट रन रेटचा विचार करण्याची गरजच या स्थितीमध्ये भासणार नाही. प्रत्येकी सात गुण असणारे दक्षिण आफ्रिका आणि भारत पुढील पेरीसाठी पात्र ठरतील. बांगलादेशही पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास जास्तीत जास्त सहा गुणांपर्यंत मजल मारु शकतो. त्यामुळे सहा तारखेला इतर संघांच्या कामगिरीवर निर्भर न राहता सामना रद्द होऊन गुण वाटून दिले तरी भारत उपांत्यफेरीसाठी पात्र ठरेल.