अ‍ॅडलेड ओव्हल येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून १० विकेट्सने लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. त्याचबरोबर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यानंतर माजी कर्णधार नासेर हुसेन यांनी भारतीय संघ जुन्या पद्धतीचे पॉवर प्ले क्रिकेट खेळत असल्याची टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांगली बॅटिंग लाइनअप असूनही, स्पर्धेत चांगली सुरुवात न करण्याच्या भारताच्या सततच्या समस्येने त्यांना पुन्हा निराश केले. जेव्हा त्यांनी पॉवरप्लेमध्ये फक्त १ बाद ३८ धावा केल्या होत्या, तेव्हा इंग्लंडच्या संघाने बिनबाद धावा केल्या होत्या. त्यामुळे ते तुलनेने खूपच वाईट होते. जोस बटलर नाबाद ८० आणि अॅलेक्स हेल्स नाबाद ८६ क्रीजवर होते. त्यांनी ४ षटके बाकी असताना १६९ धावांचे लक्ष्य पार केले.

स्काय स्पोर्ट्सवर बोलताना हुसैन म्हणाला, “जेव्हा तुम्ही इंग्लंडच्या पहिल्या सहा षटकांवर नजर टाकली, तर लक्षात येईल की, तेव्हा भारताने मोठी चूक केली. हेल्स आणि बटलर जसं खेळत होते तसंच खेळायला हवे होते. परंतु भारत अजूनही जुन्या पद्धतीनं पॉवरप्ले क्रिकेट खेळत आहे.”

हेही वाचा – T20 World Cup: विराटची बॅट तर तळपली, पण नशिबी ट्रॉफी नाही झळकली!

माजी कर्णधार मायकेल आथर्टन यांनी हुसेनच्या मतांशी सहमती दर्शवली आणि भारताच्या गोलंदाजीवर टीका केली, ज्यामुळे इंग्लंडला रविवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळण्यापासून रोखले नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने भारताला पराभूत केल्याबद्दल बटलरच्या संघाचे कौतुक केले. तो म्हणाला,”इंग्लंडने एक अतिशय चांगला भारतीय संघ सामान्य केला आणि ते करणे खूप कठीण आहे. त्यात नियोजन आणि अंमलबजावणी चांगली आहे.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India are still playing old fashioned powerplay cricket says former england captain nasser hussain in t20 world cup 2022 vbm
Show comments