India Bangladesh Fake Fielding: अगदी शेवटच्या चेंडूवर भारताने बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाच धावांनी विजय मिळवला. अर्धा तास पडलेला पाऊस आणि क्षेत्ररक्षणामधील कामगिरीच्या जोरावर भारताने हा निसटता विजय मिळवला. मात्र याच क्षेत्ररक्षणासंदर्भात एका आक्षेप बांगलादेश संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज नुरूल हसनने सामन्यानंतर घेतला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिजवर असलेल्या नुरुलने विराट कोहलीवर ‘फेक फिल्डींग’चा आरोप केला आहे. विराटने केलेली कृती पंचांनी वेळीच पाहिली असती तर आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या, असं नुरुल म्हणाला आहे. म्हणजेच विराट कोहलीची ही कथित ‘फेक फिल्डींग’ वेळीच पकडली गेली असती तर आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळून सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता असं नुरुलने सुचित केलं आहे.

नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण

Rohit Sharma and Akash Deep injured during practice sports news
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास
India vs Australia 3rd Test Cricket Match KL Rahul statement on batting sports news
पहिली ३० षटके गोलंदाजांची, मग फलंदाजी सोपी- राहुल
IND vs AUS Big Blow to Australia as Josh Hazlewood Suffers Calf Injury went Hospital for Scans Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला गाबा कसोटीत मोठा धक्का, ‘या’ गोलंदाजाला नेलं हॉस्पिटलमध्ये; एक षटक टाकताच गेला होता मैदानाबाहेर
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड
Rohit Sharm Trolled for Bowling First in IND vs AUS 3rd Test in Brisbane
IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?
ajinkya rahane batting in syed mushtaq ali trophy
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेची बॅट पुन्हा तळपली; सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई अंतिम फेरीत, केकेआरने दिली अशी प्रतिक्रिया…

लिटन दास आणि नाजमुल सांतो यांनी १८४ धावांचा पाठलाग करताना पाऊस सुरु होण्यापूर्वीच्या सात षटकांमध्ये भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. सात षटकांमध्ये बिनबाद ६६ वरुन बांगलादेशचा पराभव झाल्याने तो चाहत्यांबरोबरच खेळाडूंनाही जिव्हारी लागला आहे. शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करुन नाबाद राहिलेल्या नुरुलने शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगला एक चौकार आणि षटकार लगावत बांगलादेशच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण पाच धावांनी त्यांनी हा सामना गमावला आणि सोबत उपांत्यफेरीत पोहोचण्याची शक्यताही धुसर झाली आहे. सामन्यानंतर नुरुलने विराटवर खोटा थ्रो केल्याचा आरोप करत ‘फेक फिल्डींग’कडे इशारा केला. “पावसामुळे नक्कीच आमच्या खेळावर परिणाम झाला. पण यावेळी एक खोटा थ्रो करण्यात आला, ज्यामुळे आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या,” असं नुरुलने म्हटलं.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

नेमकं घडलं काय?
विराट कोहलीने ‘फेक फिल्डींग’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये अ‍ॅडलेडच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर पाच धावांनी विजय मिळवला. सामन्यातील सातव्या षटकामध्ये कोहलीने केलेली कृती पंचांच्या नजरेतून हुकल्याचा दावा बांगलादेशी चाहत्यांकडून आणि खेळाडूंकडून केला जात आहे. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने सीमारेषेजवळ मारलेला चेंडू अर्शदीप सिंगने यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे फेकला तेव्हा कोहलीने चेंडू आपल्याकडे टाकण्यात आला असून आपण रिलेपद्धतीने तो नॉन स्ट्रायकर्स एण्डला फेकत असल्याची कृती केली. मात्र चेंडू अर्शदीपकडून थेट दिनेश कार्तिकच्या हातात विसावला. यावेळी मैदानातील पंच म्हणजेच मारिस एरॅसमस आणि ख्रिस ब्राऊन या दोघांनाही विराटची ही कृती पाहिली नाही. तसेच लिटन दास आणि सांतोनेही त्यावेळी ही कृती पाहिली नाही.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

सामन्यानंतर म्हणजेच पाच धावांनी पराभूत झाल्यानंतर मात्र नुरूल हसनने यावर आक्षेप घेत विराटवर ‘फेक फिल्डींग’चा आरोप केला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

India Bangladesh Fake Fielding Video Of Virat Kohli:

खरंच बंगलादेशला मिळाल्या असत्या का पाच धावा?
नुरुलने बांगलादेशला पाच धावा मिळाल्या असत्या असा उल्लेख सामन्यानंतर विराटच्या ‘फेक फिल्डींग’संदर्भात बोलताना केला. मात्र खरोखर बांगलादेशला या धावा मिळाल्या असत्या का असा प्रश्न विचारल्यास नियमांप्रमाणे त्याचं उत्तर हो असं द्यावं लागेल. आयसीसीच्या नियम क्रमांक ४१.५ नुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूने जाणूनबुजून त्याच्या बोलण्यामधून किंवा कृतीतून फलंदाजाचं लक्ष विचलित करण्याचा, त्याची फसवणूक करण्याचा किंवा फलंदाजीमध्ये अडथळा करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. जर पंचांना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूकडून असं काही झाल्याचं आढळलं तर ते संबंधित बॉल डेड बॉल जाहीर करु शकतात तसेच पाच धावा पेनाल्टी धावा म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाला देऊ शकतात. म्हणजेच विराटच्या ‘फेक फिल्डींग’वर फलंदाजांनी किंवा पंचांनी वेळीच आक्षेप घेतला असता तर कदाचित बांगलादेशला अतिरिक्त पाच धावा मिळाल्या असत्या.

नक्की वाचा >> विश्लेषण: भारताने बांगलादेशविरुद्ध विजय कसा खेचून आणला? उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित का?

पाच धावा मिळाल्या असत्या तरी…
‘फेक फिल्डींग’साठी भारताला दंड म्हणून पाच धावा बांगलादेशच्या खात्यात जमा झाल्या असत्या तर डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशला देण्यात आलेलं लक्ष्यही वेगळं असतं. कारण पावसामुळे सामना थांबवण्याच्या तीन चेंडू आधी हा सारा प्रकार घडला. त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार जर-तरच्या शक्यतेमध्येच चर्चा केला जाऊ शकतो असं अनेक चाहत्यांचं मत आहे.

नक्की पाहा >> Ind vs Ban: बांगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न

या पाच धावा बांगलादेशला मिळाल्या असत्या तर डकवर्थ-लुईस नियमानुसार वेगळ्या आकडेवारीच्या आधारे लक्ष्य निश्चित करण्यात आलं असतं. त्यामुळे बांगलादेशला न मिळालेल्या या पाच धावाच भारताच्या विजयाला कारणीभूत ठरलं असलं म्हणणं धाडसाचं ठरेल.

Story img Loader