India vs England Score, T20 World Cup 2024 Semi Final: भारतीय संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या फिरकीपटूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. जोस बटलर आणि हॅरी ब्रुक वगळता एकही फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोन्ही फिरकीपटूंनी भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीमुळे भारत एक चांगली धावसंख्या उभारू शकला. इंग्लंडवर भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आणि या विजयासह भारताने १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

भारताने इंग्लंडला सर्वबाद करत टी-२० विश्वचषक २०२२ मधील उपांत्य फेरीतील १० विकेट्सच्या पराभवाचा व्याजासकट बदला घेतला आहे. २०२२ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले होते. पण यावेळी भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत आपला बदला पूर्ण केला.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Sharma Stump Mic Upar Dega to Deta hai na Said to Suryakumar Yadav And Hits Six
IND vs ENG: “उपर डाला तो देता हूं ना…” हिटमॅन शब्दाचा पक्का, रोहितने सूर्याला सांगून लगावला दणदणीत षटकार; VIDEO व्हायरल
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
India Beat Australia by 21 Runs and Enters in T20 World Cup Semi Final in Marathi
IND vs AUS: भारताने विश्वविक्रमासह सेमीफायनलमध्ये ऐटीत मारली धडक, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित-कुलदीप ठरले मॅचविनर
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

हेही वाचा- IND vs ENG Semi Final 2 Highlights : उपांत्य फेरीत भारताचा दणदणीत विजय, अक्षर-कुलदीपच्या फिरकीपुढे इंग्लंडने टेकले गुडघे

भारताने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बटलरने संघाला चांगली सुरूवात करून दिली. बटलरने अर्शदीपच्या तिसऱ्या षटकात ३ चौकार लगावत भारताला धक्का दिला, पण रोहित शर्माने फिरकीपटूला साजेशा खेळपट्टीवर स्पिन अटॅक सुरू केला. अक्षर पटेलला चौथे षटक देण्यात आले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर बटलरला बाद करत मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर बुमराहने पुढच्या षटकात भेदक गोलंदाजी करत फिल सॉल्टला क्लीन बोल्ड केलं.

हेही वाचा – IND vs ENG: “उपर डाला तो देता हूं ना…” हिटमॅन शब्दाचा पक्का, रोहितने सूर्याला सांगून लगावला दणदणीत षटकार; VIDEO व्हायरल

अक्षरच्या पुढच्या षटकात पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर त्याने जॉनी बेअरस्टोला क्लीन बोल्ड करत खातेही उघडू न देता माघारी धाडले. यानंतर पुन्हा एकदा आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोईन अलीला पंतने झटपट स्टंपिंग करत बाद केलं. अक्षरनंतर फिरकी विभागाकडून विकेटस घेण्याची जबाबदारी कुलदीपने घेतली आणि नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅम करनला पायचीत केले. त्यानंतर सर्वाधिक धावा कपत मैदानात असलेल्या हॅरी ब्रुकला क्लीन बोल्ड करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर जॉर्डनला पायचीत करत सातवी विकेट मिळवून दिली. तर अक्षरच्या षटकात कुलदीप आणि अक्षरने मिळून लिव्हिंगस्टोनला धावबाद केले.

हेही वाचा – IND vs ENG: रोहित शर्माचा नवा विक्रम, भारताच्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत मिळवले स्थान

यानंतर हार्दिक पंड्याच्या षटकात सूर्यकुमार शानदार फिल्डिंग करत आदिल रशीदला धावबाद केले तर बुमरहाने १७व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरला पायचीत करत संघाला ६८ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. भारताकडून अक्षर पटेलने ४ षटकांत २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या तर कुलदीपने ४ षटकांत १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर बुमराहने २ विकेट्स मिळवल्या. तर दोन खेळाडू धावबाद झाले.

भारत इंग्लंडमधील सेमीफायनलची नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. यादरम्यान रोहिच शर्माने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या. तर, सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत४७ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्यानेही १३ चेंडूत २३ धावा केल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजाने १७ धावांची नाबाद खेळी केली. अक्षर पटेलही १० धावा करून नाबाद राहिला. अक्षर पटेलच्या अखेरच्या षटकातील एका षटकाराने भारत १७१ धावांपर्यंत मजल मारू शकला.