Fans Slams Dinesh Karthik For Poor Fielding: टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने दुसरा विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला चार गडी राखून हरवल्यानंतर आज झालेल्या सामन्यात भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. भारताने दुबळ्या नेदरलँड्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. (India beat Netherlands by 56 runs) या सामन्यामध्ये मागील सामन्याप्रमाणेच विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. तर सूर्यकुमार यादवनेही तुफान फटकेबाजी करत २५ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. या विजयानंतर अनेक क्रिकेटपटूंनी ट्वीटरवरुन फोटो शेअर केले. मात्र भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला हे फोटो शेअर करणं थोडं महागात पडल्याचं फोटोंखालील केमंट्सवरुन दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताने १७९ धावांचं आव्हान दिल्यानंतर नेदरलँड्सचा डाव निर्धारित २० षटकांमध्ये ९ गडी बाद १२३ वर आटोपला. के. एल. राहुल वगळता भारताच्या तिन्ही सलामीवीरांनी वैयक्तीक अर्धशतकं झळकावली. रोहित शर्माने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. तर विराट कोहली या सामन्यातही नाबाद राहिला. त्याने ४४ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. तर रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या फटकेबाजीमध्ये २५ चेंडूंमध्ये ५१ धावांची नाबाद खेळी केली. भारतीय फलंदाजांच्या या कामगिरीला गोलंदाजांनी चांगली साथ दिली. नेदरलँड्सचे ९ गडी तंबूत परतले. मात्र ते निर्धारित लक्ष्यापासून ५६ धावा दूरच राहिले.

नक्की वाचा >> Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..

गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली झाल्याने भारताने हा सामना सहज जिंकला असला तरी भारतीय चाहते संघाच्या सुमार क्षेत्ररक्षणावर खास करुन यष्टीरक्षक असलेल्या दिनेश कार्तिकच्या या सामन्यातील कामगिरीवर समाधानी असल्याचं दिसत नाही. दिनेश कार्तिकने दोन सोपे झेल सोडले आणि दोनदा यष्टीचित करण्याची संधीही सोडल्याचं दिसून आलं. आर. अश्वीन आणि अक्षर पटेलच्या फिरकी गोलंदाजीवर कार्तिक यष्ट्यांमध्ये चाचपडताना दिसला. कार्तिकने सामना संपल्यानंतर संघाबरोबर विकेट सेलिब्रेट करतानाचा एक आणि कोहली, सूर्यकुमार चालताना एक असे दोन फोटो शेअर करत दुसरा विजय अशा कॅप्शनसहीत फोटो पोस्ट केले आहेत.

नक्की वाचा >> Video: २५ बॉलमध्ये ५१ धावा अन् तो षटकार…; शेवटच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने काय केलं पाहिलं का?

मात्र अनेकांनी या फोटोंखाली भावा तू विकेट कीपींगवर लक्ष दे असा सल्ला कार्तिकला दिला आहे. अनेकांनी तर एवढ्या उत्साहाने फोटो पोस्ट करणाऱ्या कार्तिकचं या विजयामधील योगदान काय असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी तर गंभीर शब्दांचा वापर करत कार्तिकला अगदी झापल्याचं दिसून आलं. वेळीच सुधर नाहीतर ऋषभ पंत बाहेर तयारच बसला आहे, असा सल्लाही अनेकांनी त्याला दिला आहे. पाहू यात चाहत्यांच्या काही प्रतिक्रिया…

नक्की वाचा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

एकंदरितच हे सर्व रिप्लाय पाहिल्यावर दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीमुळे चाहत्यांचा रोष ओढावून घेतल्याचं म्हणता येईल. भारताचा पुढील सामना रविवारी ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.