T20 World Cup 2024, IND vs SA Final: भारतीय संघाने १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-२० चॅम्पियन ठरला.. भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्यासारखे भारताच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून विजयाश्रू आले.

हेही वाचा – Rahul Dravid: ट्रॉफी हातात घेत राहुल द्रविडची सिंहगर्जना; क्रिकेटप्रेमींनी शांत, संयमी द्रविडचा असा अवतार कधीच पाहिला नसेल, VIDEO व्हायरल

शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवत सर्वांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला.

हेही वाचा – IND vs SA Final: रोहित शर्माच्या टीम इंडियाने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

बुमराहने भेदक गोलंदाजी करत पुन्हा एकदा भारताच्या विजयाच्या आशा वाढवल्या. या षटकात बुमराहने चौथ्या चेंडूवर यान्सनला क्लीन बोल्ड केले. या सामन्यात एके काळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा विजय निश्चित दिसत होता, त्यानंतर जसप्रीत बुमराहने १६ व्या षटकात केवळ ४ धावा दिल्या आणि १८व्या षटकात केवळ २ धावा दिल्यावर मार्को यान्सनची विकेटही घेतली, त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात पुनरागमन करण्यात यश मिळवले आणि येथून आफ्रिकन संघावरही दडपण आणले. अर्शदीप सिंगने १९व्या षटकात ४ धावा दिल्या, तर हार्दिकने शेवटच्या षटकात केवळ ८ धावा देत टीम इंडियाला ७ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा – Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती, वर्ल्डकप विजयानंतर ‘रो-को’ चा भारतीय चाहत्यांना धक्का

१७७ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत ८ विकेट गमावून केवळ १६९ धावा करता आल्या आणि भारतीय संघाने ७ धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी ६ पेक्षा कमी इकॉनॉमीवर धावा दिल्या आणि २-२ विकेट घेतल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने २० धावांत ३ विकेट घेतले.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. संथ खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्ये ३ बाद ३४ धावा अशी परिस्थिती असताना भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आणि टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली. या इनिंगमध्ये विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.