India beat USA by 7 wickets to become first team to reach Super 8 round : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या २५व्या सामन्यात यजमान अमेरिका आणि भारत यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यजमान अमेरिकेवर ७ विकेट्सनी मात करत सलग तिसरा विजय मिळवला. त्याचबरोबर भारत टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. या सामन्याात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीपच्या शानदार कामगिरीच्या (४ विकेट्स) जोरावर अमेरिकेला ११० धावांवर रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार आणि शिवमने भारताला १८.२ षटकांत विजय मिळवून दिला.

भारत सुपर ८ मध्ये दाखल होणारा ठरला तिसरा संघ –

सुरुवातीच्या धक्क्यातून सावरलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर टी-२० विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यात अमेरिकेचा सात गडी राखून पराभव करून सुपर एट टप्प्यासाठी पात्र ठरले आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने २० षटकांत आठ गडी गमावून ११० धावा केल्या. प्रत्युत्तरात सौरभ नेत्रावळकरने भारताला सुरुवातीला दोन धक्के दिले, पण सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावून संघाला सावरले आणि दुसऱ्या टोकाला शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. या दोन फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून ११ धावा करून विजय मिळवला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय असून त्याने सहा गुण घेत सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले आहे.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
India beat Pakistan by Runs in T20 World Cup 2024
IND vs PAK: ऋषभने रचला पाया, बुमराहने रचला कळस; भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
India Beat Australia by 21 Runs and Enters in T20 World Cup Semi Final in Marathi
IND vs AUS: भारताने विश्वविक्रमासह सेमीफायनलमध्ये ऐटीत मारली धडक, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित-कुलदीप ठरले मॅचविनर
penalty rule imposed
IND VS USA T20 World Cup: पेनल्टीचा भुर्दंड बसला आणि अमेरिकेने टाकली मान; काय आहे नवीन नियम?
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

सूर्या-शिवमच्या भागीदारीने भारताला मिळवून दिला विजय –

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून अमेरिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले परंतु वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात अमेरिकेला दुहेरी धक्का दिला. ज्यातून संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक २७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवातही चांगली झाली नाही आणि विराट कोहलीच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. कोहली खाते न उघडताच बाद झाला. यानंतर सौरभने भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एकेकाळी संघ संकटात सापडलेला दिसत होता, पण सूर्यकुमार आणि शिवमने जबाबदारी सांभाळली आणि भारताला विजयापर्यंत नेले. सूर्यकुमार यादव ४९ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ५० धावा करून नाबाद राहिला तर शिवम दुबे ३५ चेंडूंत एक चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा करून नाबाद राहिला.

हेही वाचा – USA vs IND Live Score, T20 World Cup 2024: सूर्या दादाच्या अर्धशतकासह भारताचा अमेरिेकवर विजय, भारताची सुपर८ मध्ये धडक

अर्शदीप सिंगने रचला इतिहास –

टीम इंडियाने अमेरिकेविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी न्यूयॉर्कची खेळपट्टी वरदान ठरली. त्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर अमेरिकेचा फलंदाज शायान जहांगीरला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठवत ऐतिहासिक कामगिरी केली. तो टी-२० विश्वचषकात भारतासाठी सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला आणि जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने आपल्या ४ षटकात केवळ ९ धावा देत ४ विकेट्स घेत अनेक विक्रम केले. त्याचवेळी हार्दिक पंड्यानेही दोन विकेट्, घेतल्या. अशा प्रकारे भारताने अमेरिकन संघाला ११० धावांवर रोखले.

हेही वाचा – IND vs USA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! आतापर्यंत कोणत्याच भारतीय गोलंदाजाला न जमलेला केला पराक्रम

सुपर ८ च्या पाकिस्तानच्या आशा कायम –

सुपर ८ मध्ये जाण्यासाठी पाकिस्तान संघासाठी अमेरिकेला भारताकडून हरावे असे समीकरण होते. भारतीय संघाने यजमान अमेरिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या सुपर ८ मध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. पाकिस्तान संघाला पुढच्या टप्प्यात जायचे असेल तर आयर्लंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. यासोबतच, अमेरिकेला त्याच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागतो.