India T20 World Cup Victory Parade in Mumbai: टी-२० विश्वचषक २०२४ चा विश्वविजेता भारतीय संघ लवकरच मायदेशात दाखल होणार आहे. टीम इंडिया बार्बाडोसहून भारतात येण्यासाठी रवाना झाली आहे. बीसीसीआयने संघासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. २९ जून रोजी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर बार्बाडोसमध्ये वादळ आले होते. या वादळामुळेच भारतीय संघ तिथे अडकला होता. पण आता भारतीय संघ, सपोर्ट स्टाफ, कुटुंबिय आणि पत्रकारांसहित एक स्पेशल विमान भारताच्या दिशेन रवाना झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो”

भारतीय संघ सर्वप्रथम घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

भारतीय वेळेनुसार दुपारी हे विमान बार्बाडोसवरून रवाना झालं असून गुरूवारी पहाटे भारतात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे इथे आल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि बीसीसीआयचे अधिकारी सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील, त्याचे वेळापत्रक आता समोर आले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण टीम इंडिया बार्बाडोसहून स्पेशल फ्लाइटने गुरुवारी सकाळी थेट दिल्लीला पोहोचेल. यानंतर भारतीय संघ पीएम मोदींची सकाळी ११ वाजता भेट घेणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी सर्व भारतीय खेळाडूंना भेटतील आणि तिथे त्यांचा सत्कारही केला जाईल.

टीम इंडियाने २९ जूनच्या रात्री टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर त्याच रात्री पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. ज्याचा व्हिडिओही समोर आला होता. एवढेच नाही तर त्याने भारतीय खेळाडूंशी फोनवरही बोलणं झालं. याचसोबत त्यांनी एक्सवर याचे फोटो शेअर केले.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

भारतीय संघाचा खुल्या बसमधून विजयी परेडचा मार्ग

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर भारतीय संघ मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत आल्यावर संघ खुल्या बसमधून ट्रॉफीसह गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सपासून प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमपर्यंत परेड करेल. “खेळाडू थकले असल्याने एनसीपीए, नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून छोटा विजयी परेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बक्षीस वितरण असेल. जिथे १२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचे वितरण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते केले जाईल. असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका सूत्राने सांगितले.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

टीम इंडियाचे ४ जुलैला भारतात दाखल झाल्यानंतरचे वेळापत्रक

पहाटे संघ दिल्लीत दाखल होणार
११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुंबईसाठी रवाना.
विमानतळावरून वानखेडेकडे रवाना
एनसीपीए नरिमन पॉईंट ते वानखेडे विजयी परेड.
वानखेडे स्टेडियमवर छोटासा कार्यक्रम

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India cricket teams schedule after landing in india t20 world cup 2024 pm modis felicitation to open bus parade bdg