India to Face Australia in T20 World Cup 2024 Super Eight Stage: टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ फेरीसाठी आतापर्यंत ४ संघ निश्चित झाले आहेत. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि वेस्ट इंडिज या संघांनी सलग तीन सामने जिंकत सुपर८ फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ अ गटातून, आफ्रिका संघ ड गटातून पात्र ठरला आहे, ऑस्ट्रेलियन संघ ब गटातून तर वेस्ट इंडिजच्या संघाने क गटातून आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाला आहे. त्याचवेळी, सुपर८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना देखील निश्चित झाला आहे. ज्याबद्दल आयसीसीने देखील वेळापत्रकात माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाला अजूनही अ गटातील शेवटचा सामना खेळायचा आहे ज्यात त्यांचा सामना कॅनडाच्या संघाशी होईल जो १५ जून रोजी फ्लोरिडाच्या मैदानावर खेळला जाईल. यानंतर टीम इंडिया आपले पुढील सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यासाठी रवाना होईल. सुपर ८ फेरीत भारत एकूण तीन सामने खेळणार आहे. भारताचे हे तीन सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार हे निश्चित झाले आहे.

हेही वाचा – IND v USA: बोरिवलीतील अनेक खेळाडू या सामन्यात असं शास्त्रींनी म्हणताच रोहित शर्मा पाहा काय म्हणाला, “त्यांच्यासोबत एकत्र क्रिकेट…”

आयसीसीच्या निर्णयानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही संघांमधील हा सामना २४ जून रोजी सेंट लुसियाच्या मैदानावर होणार आहे. सुपर८ मधील भारतीय संघाचा हा तिसरा आणि शेवटचा सामना असेल, त्याआधी त्यांना आणखी २ सामने खेळावे लागतील. टीम इंडिया सुपर८ टप्प्यातील पहिला सामना २० जून रोजी बार्बाडोस येथे खेळणार आहे, तर त्यानंतर २२ जून रोजी अँटिगा येथे पुढील सामना खेळणार आहे. सुपर८ मधील भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरूद्ध होणार आहे तर दुसऱ्या सामन्यासाठी प्रतिस्पर्धी संघ निश्चित नसला तरी बांगलादेश किंवा नेदरलँड्सचा संघ असण्याची शक्यता आहे.

भारताचं सुपर८ मधील सामन्यांच वेळापत्रक

२० जून – भारत वि अफगाणिस्तान, बार्बाडोस

२२ जून – अँटिगा (बांगलादेश किंवा नेदरलँड्स)

२४ जून – भारत वि ऑस्ट्रेलिया, सेंट लुसिया

हेही वाचा – T20 WC 2024: यजमान वेस्ट इंडिज दिमाखात सुपरएट फेरीत; न्यूझीलंडवर घरवापसीची टांगती तलवार

टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा विक्रम आतापर्यंत चांगला राहिला आहे. ज्यामध्ये या स्पर्धेच्या इतिहासात त्यांनी कांगारू संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने ३ सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियन संघाने २ सामने जिंकले आहेत. २०१० मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत, जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजच्या ब्रिजटाऊन स्टेडियमवर आमनेसामने होते, तेव्हा कांगारू संघाने ४९ धावांनी सामना जिंकला होता.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia match in t20 world cup 2024 super eight stage 24 th june icc announced bdg