T20 World Cup 2022, IND vs BAN Highlights Score Updates: टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीला टी२० विश्वचषक २०२२ मध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. तो सुरुवातीपासूनच चाचपडत खेळताना दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने ८ चेंडूवर २धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूवर ५० धावा केल्या. केएल राहुलने थोडा वेळ घेत नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली त्याला विराट कोहली चांगली साथ मिळाली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतकी खेळीनंतर शकिबने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत आक्रमक ३० धावांची खेळी करत आपले इरादे स्पष्ट केले होते.
शेवटच्या तीन षटकात बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना केवळ अक्षर पटेलला बाद करण्यात यश आले. विराटने १९व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर दहा धावा वसूल केल्या. रविचंद्रन अश्विननेही अखेरच्या षटकात एक चौकार व एक षटकार लगावला. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १८४ धावा केल्या. विराटने नाबाद ६४ धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी हसन मेहमूदने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
India vs Bangladesh T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध बांगलादेश टी२० विश्वचषक २०२२ हायलाइट्स
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
बांगलादेश १४५-६
हार्दिक पांड्याच्या १५व्या षटकात बांगलादेशने तस्कीन अहमदने एक चौकार आणि एक षटकार मारत सामन्यात रंजक स्थितीत आणला. आता शेवटच्या षटकात ६ चेंडूत २० धावांची गरज आहे.
बांगलादेश १३१-६
टीम इंडियासाठी शेवटचे दोन षटके महत्वाची आहेत. बांगलादेशला विजयासाठी १२ चेंडूत ३१ धावांची गरज आहे.
बांगलादेश १२०-६
हार्दिक पांड्याने एकाच षटकात दोन गडी बाद केले. मुसद्देक हुसेन ६ धावा करून बाद झाला.
बांगलादेश १०८-६
हार्दिक पांड्याने यासीर अलीला अवघ्या एका धावेवर अर्शदीप सिंग करवी झेलबाद केले.
बांगलादेश १०२-५
अर्शदीप सिंगने एकाच षटकात दोन गडी बाद केले. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन १३ धावा करून बाद झाला.
बांगलादेश १००-४
अर्शदीप सिंगने भारतीय संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला. अफिफ हुसैन ३ धावा करून बाद झाला. सुर्यकुमार यादवने शानदार झेल पकडला.
बांगलादेश ९९-३
शकीब अल हसनने अश्विनच्या एका षटकात सलग दोन चौकार मारले. बांगलादेशला ३० चेंडूत ५२ धावांची गरज आहे.
बांगलादेश ९९-२
४२ चेंडूत ६७ धावांची बांगलादेशला गरज असून भारताला विकेट्सची गरज होती, तेवढ्यात नजमुल हुसेन शांतो बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने २१ धावांवर बाद केले.
बांगलादेश ८४-२
बांगलादेशला पहिला धक्का बसला असून धोकादायक लिटन दास बाद झाला. केएल राहुलने जबरदस्त थ्रो करत त्याला धावबाद केले. त्याने ६० धावा केल्या.
बांगलादेश ६८-१
पाऊस थांबला असून आता सामन्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेशला आता ५४ चेंडूत ८५ धावांची गरज आहे.
बांगलादेश ६६-०
४.५० वाजता सामना सुरु होणार असून १६ षटकात १५१ धावांची बांगलादेशला दिले टार्गेट दिले. म्हणजे ५४ चेंडूत ८५ धावांची गरज आहे.
बांगलादेश ६६-०
टीम इंडियाने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या आहेत. मात्र पावसाने मध्ये खोडा घातला आहे. थोड्याच वेळात सामना सुरु होणार आहे.
बांगलादेशचे कमी होणाऱ्या षटकात असणारे लक्ष्य
१९ षटके: १७७
१७ षटके: १६०
१५ षटके: १४२
१२ षटके: ११२
१० षटके: ८९
बांगलादेश ६६-०
पाऊस थांबला! पण मैदान मात्र अजूनही ओलसर आहे. तसेच पावसाची अजून एक सर येण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार ४.२८ मिनिटांनी सामन्याची षटके कमी होण्यास सुरुवात होईल आणि टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आहे.
बांगलादेश ६६-०
सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ७ षटकानंतर ४९ धावांची गरज असताना बांगलादेश १७ धावांनी पुढे आहे.
बांगलादेश ६६-०
धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची दमदार सुरुवात झाली आहे. पॉवर प्ले मध्ये त्यांनी १० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
बांगलादेश ६०-०
६ चौकार, ३ षटकारांच्या मदतीने लिटन दासने अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाला लवकरात लवकर विकेट्सशी गरज आहे.
बांगलादेश ५८-०
https://twitter.com/ICC/status/1587752999266426882?s=20&t=FpAtB5fF0i7WUKD2YsK7sQ
आर. आश्विनच्या थ्रो वर लिटन दास धावबाद होता होता वाचला. सध्या भारताला विकेट्सची गरज आहे.
बांगलादेश ३७-०
लिटन दासची भुवनेश्वर कुमारच्या षटकात चौकार- षटकार आतिषबाजी सुरु असताना दिनेश कार्तिककडून झेल सुटला.
बांगलादेश ३०-०
बांगलादेशच्या लिटन दासला जीवदान मिळाले. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर कार्तिकच्या पुढे चेंडूचा टप्पा पडला.
बांगलादेश १४-०
धावांचा पाठलाग बांगलादेशचे सलामीवीर मैदानात आले.
बांगलादेश ०-०
शेवटच्या आर. अश्विनच्या फटकेबाजीने भारताला १८० पार पोहचवले. टीम इंडियाने बांगलादेशसमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले.
भारत १८४-६
मिळालेल्या जीवदानाचा अक्षर पटेल फायदा उठवण्यात अपयशी ठरला. शकीबने झेल सोडला होता अगोदरच्या चेंडूवर मात्र पुढच्याच षटकात त्याने झेल पकडला. त्याने ७ धावा केल्या.
भारत १५८-६
https://twitter.com/BCCI/status/1587740098627616769?s=20&t=cYzzyzjRbBFadhqbFMlBZw
मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलला जीवदान मिळाले.
भारत १५७-५
विराट-कार्तिक मधील गोंधळात दिनेश कार्तिक बाद झाला आहे. त्याने ७ धावा केल्या. त्याला कर्णधार शकीबने बाद केले.
भारत १५०-५
https://twitter.com/BCCI/status/1587738810024185856?s=20&t=Bj5NNjnFk-xqF7SE8h1vcg
टी२० विश्वचषक २०२२ मधले तिसरे अर्धशतक विराटने साजरे केले. त्याने ३७ चेंडूत ५० धावा केल्या.
भारत १५०-४
https://twitter.com/BCCI/status/1587737979140730880?s=20&t=gKhoBWNxSyyrm3FY8wBJlQ
नो-बॉलवरून विराट- शकीब अल हसन यांच्यात बातचीत झाली. पंचांच्या निर्णयावर शकीब नाराज झाला होता. मात्र त्याला समजावले.
भारत १४५ -४
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1587737039281307652?t=2vH-3DSkWP-aKYBariUiyw&s=08
हसन महमूदने हार्दिक पांड्याला बाद केले. त्याने अवघ्या ५ धावा केल्या. यासिर अलीने त्याचा झेल घेतला.
भारत १३०-४
https://twitter.com/BCCI/status/1587735561699266560?s=20&t=M8xnrRCZn5WpDhpY0KQ7bw
सूर्याने येताच चौकार-षटकारांची आतिषबाजी सुरु केली होती. २०० च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा काढल्या. १६ चेंडूत ३० धावा केल्या. शकीब अल हसनने त्याला त्रिफळाचीत केले.
भारत ११६-३
India vs Bangladesh T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध बांगलादेश टी२० विश्वचषक २०२२ हायलाइट्स
आयसीसी टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामन्यात भारताने हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.