T20 World Cup 2022, IND vs BAN Highlights Score Updates: टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीला टी२० विश्वचषक २०२२ मध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. तो सुरुवातीपासूनच चाचपडत खेळताना दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने ८ चेंडूवर २धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूवर ५० धावा केल्या. केएल राहुलने थोडा वेळ घेत नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली त्याला विराट कोहली चांगली साथ मिळाली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतकी खेळीनंतर शकिबने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत आक्रमक ३० धावांची खेळी करत आपले इरादे स्पष्ट केले होते.

शेवटच्या तीन षटकात बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना केवळ अक्षर पटेलला बाद करण्यात यश आले. विराटने १९व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर दहा धावा वसूल केल्या. रविचंद्रन अश्विननेही अखेरच्या षटकात एक चौकार व एक षटकार लगावला. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १८४ धावा केल्या. विराटने नाबाद ६४ धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी हसन मेहमूदने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

Live Updates

India vs Bangladesh T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध बांगलादेश टी२० विश्वचषक २०२२ हायलाइट्स

14:31 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: सुर्यकुमार यादवला मिळाले जीवदान

शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर सुर्यकुमारला जीवदान मिळाले आहे. मुस्तफिजुर रहमानने त्याचा झेल सोडला. भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या.

भारत १०१-२

14:25 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: टीम इंडिया मजबूत स्थितीत

दहा षटकानंतर भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे. राहुलच्या अर्धशतकाने टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर आहे.

भारत ८६-२

14:20 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: केएल राहुल अर्धशतक करून बाद

फॉर्म हरवलेला केएल राहुने शानदार अर्धशतक केले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने त्याला बाद केले.

भारत ७८-२

14:15 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: केएल राहुलची शानदार फटकेबाजी

केएल राहुलने चौकार-षटकारांची आतिषबाजी करत आहे. राहुलचा फॉर्म हा पुन्हा परत आला असे यावरून दिसत आहे.

भारत ७१-१

14:11 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: विराट-राहुलने डाव सावरला

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडिया संकटात असताना विराट आणि राहुलने डाव सावरला. भारताचे ५० धावा देखील पूर्ण झाल्या.

भारत ५२-१

14:08 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: टी२० विश्वचषकात विराट कोहलीने जयवर्धनेचा विक्रम मोडला

टी२० विश्वचषकात विराट कोहलीने महेला जयवर्धने १०१६ धावांचा विक्रम मोडला.

भारत ४५-१

14:01 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताची सावध सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले मध्ये टीम इंडियाची सावध सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्याकडून संघाला मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहेत.

भारत ३७-१

13:49 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: भारताला मोठा धक्का, रोहित बाद

ज्या हसन महमूदने झेल सोडला त्यानेच भारताचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले, अवघ्या २ धावा करून तो बाद झाला.

भारत ११-१

13:46 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: रोहित शर्माला मिळाले जीवदान

तस्कीनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माचा झेल हसन महमूदने सोडला.

भारत ११-०

13:41 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: बांगलादेशची चांगली सुरुवात

पहिल्या दोन षटकात बांगलादेशच्या तस्कीन आणि शॉरीफुल इस्लाम या दोघांनी स्विंग गोलंदाजी करत भारताच्या दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले आहे.

भारत १०-०

13:31 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: सलामीवीर रोहित-राहुल मैदानात

टीम इंडियाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात आले आहेत.

भारत ०-०

13:18 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: थोड्याच वेळात दोन्ही देशांचे राष्ट्रगीत

भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे राष्ट्रगीतासाठी खेळाडू थोड्याच वेळात मैदानात पोहचणार आहेत.

13:10 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: बांगलादेश प्लेईंग-११

सौम्य सरकार ऐवजी शॉरीफुल इस्लामचा संघात समावेश केला.

13:08 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: टीम इंडिया प्लेईंग-११

अक्षर पटेलला संघात दीपक हुड्डा ऐवजी स्थान देण्यात आले.

13:03 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: बांगलादेशच्या शकीब अल हसन जिंकली नाणेफेक

बांगलादेशच्या शकीब अल हसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

13:02 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: पिच रिपोर्ट

ॲडलेड ओव्हल स्टेडियममधील खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना साथ देत आहे. मात्र झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या सामन्यावरून आधी दोन्ही संघांचे कर्णधार आधी गोलंदाजीचा निर्णय घेतील. पावसाळी वातावरण देखील आहे. तसेच ड्रोपिन पिच असल्याने येथे खूप धावा होतात.

12:51 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: भारतीय संघ स्टेडियममध्ये येताच चाहत्यांचा गराडा

टीम इंडिया ॲडलेड ओव्हल स्टेडियममध्ये पोहचताच चाहत्यांनी त्यांना सेल्फीसाठी विनंती केली. या सामन्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत.

12:03 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: संध्या हवामान ढगाळ आहे

सध्या ॲडलेड मध्ये ढगाळ हवामान असून पाऊस आणि वाऱ्यामुळे थंडावा आला आहे. काल दिवसभर पाऊस पडला होता. आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती पण ती दुपारच्या सत्रात होती. आजचा सामना पूर्ण षटकांचा होणं टीम इंडियासाठी फायद्याचे असेल.

11:57 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: टीम इंडिया पोहचली ॲडलेड मैदानात

भारतीय संघ ऐतिहासिक ॲडलेड ओव्हल स्टेडियममध्ये पोहचला असून सध्या वार्म-अप करत आहे. त्याच मैदानावर सध्या झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सचा सामना सुरु आहे. त्यानंतर भारत-बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे.

11:52 (IST) 2 Nov 2022
INDvsBAN: टीम इंडिया आज बांगलादेशशी करणार दोन हात

उपांत्य फेरीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आजचा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करेन.

आयसीसी टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामन्यात भारताने हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.