रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज टी-२० विश्वचषकामधील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. मंगळवारी अ‍ॅडलेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर आज म्हणजे बुधवारीही या ठिकाणी पावसाची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या स्पर्धेतील गुणतालिकेमधील स्थिती पाहता भारतासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना फार महत्त्वाचा आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात केली होती. भारताने पाकिस्तान आणि नेदरलॅण्डस् संघांला पराभूत करुन दोन विजयांची नोंद केली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ येथील जलद आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे तिसऱ्या सामन्यात भारताला पराभावाचं तोंड पहावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. सध्या तीन सामन्यांमध्ये चार गुणांसहित भारत गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे बांगलादेशचेही तीन सामन्यांमध्ये चार गुण असून नेट रन रेटच्या आधारे ते गुणतालिकेमध्ये भारताच्या मागे आहेत.

आज होणार सामना पावसामुळे रद्द करण्यात आला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून दिला जाईल. भारतीय संघाला साखळी फेरीमध्ये ६ नोव्हेंबर रोजी आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मेलबर्नमध्ये यापूर्वीच सुपर-१२ फेरीतील काही सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भारतासाठी उपांत्यफेरी गाठताना पाकिस्तानचा अडसर निर्माण होऊ शकतो.

नक्की वाचा >> World Cup: पुन्हा गंभीर v/s आफ्रिदी… यंदा कारण ठरला बाबर आझम; गंभीरच्या ‘स्वार्थी’ टीकेवर आफ्रिदी म्हणाला, “या स्पर्धेनंतर…”

सुपर-१२ च्या दुसऱ्या गटामध्ये भारताचा नेट रन रेट सध्या ०.८४४ इतका आहे. तर पाकिस्तानचा नेट रन रेट ०.७६५ आहे. म्हणजेच पाकिस्तान आणि भारताच्या नेट रन रेटमध्ये फारसं अंतर नाही. पाकिस्तानचे तीन सामन्यामध्ये दोन गुण असून ते पाचव्या स्थानी आहेत. उपांत्यफेरीसाठी पात्र होण्याच्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी पाकिस्तानला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच भारताला उरलेल्या दोन सामन्यामध्ये दोनपेक्षा अधिक गुण मिळू नये अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागणार आहे. पाकिस्तानचा पुढील सामना ३ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि ६ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरोधात होणार आहे.

नेट रन रेटसंदर्भात बांगलादेश, झिम्बाब्वे आणि नेदरलॅण्ड्सच्या संघ हे फारच मागे आहेत. या तिन्ही संघांचं नेट रन रेट उणेमध्ये आहे. तुम्हीच पाहा दुसऱ्या गटंची गुणतालिका भारत दक्षिण आफ्रिका सामन्याआधी कशी आहे ते…

म्हणजेच पाकिस्तानने त्यांचे दोन्ही उर्वरित सामने जिंकले आणि भारताचे दोन्ही सामने रद्द झाल्यास भारताची उपांत्यफेरीमधील वाटचाल खडतर होऊ शकते.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs bangladesh t20 world cup 2022 india next 2 matches are important but there is a danger of rain pakistan t20wc scsg