India vs Bangladesh Match Weather Report : टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अफगाणिस्तान संघाचा पराभव करून भारताने सुपर ८ ची सुरुवात केली होती, आता उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करण्याचा इरादा आहे. आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यानंतर एका संघाच्या आशा पल्लवित होऊ शकतात तर दुसरा संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ येईल. या सामन्यावर पावसाचे सावट आहे, त्यामुळे आपण भारत-बांगलादेश सामन्याशी संबंधित सर्व समीकरणे जाणून घेऊया.
भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावण्याकडे लक्ष देत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. हे जेतेपद त्यांच्यासाठी शेवटचा ठरलेला टी-२० विश्वचषक संस्मरणीय बनवू शकतो. भारताने सुपर ८ पर्यंत दमदार खेळ प्रदर्शन केले आहे. लीग स्टेजपासून हा संघ अपराजित आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने विजयाची नोंद केली आणि आता बांगलादेशचा संघ समोर आहे.
पावसामुळे सामन्यात येऊ शकतो व्यत्यय –
या मैदानावर शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात झाला होता. या सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातही हे दिसून येईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अँटिग्वा वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. वेदर डॉच नुसार, अँटिग्वा वेळेनुसार सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान तापमान ३० अंश असेल. यावेळी १८ ते २४ टक्के पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, परंतु सामना पूर्णपणे पावसाने रद्द जाणार नाही.
हेही वाचा – मी टीम इंडियाच्या भावी प्रशिक्षकाशी बोलतोय का? विचारल्यावर गौतम गंभीर म्हणाला, ‘मी एवढा….
पाऊस पडला तर काय होणार?
जर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही, तर दोन्ही संघांमध्ये १-१ गुणांचे वाटप केले जाईल. याचा फायदा भारतीय संघाला होईल तर बांगलादेशसाठी शेवटचा सामना करा किंवा मरो असा होणार आहे. भारताने एक सामना जिंकला असून दुसरा सामना जिंकल्याने त्याचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होईल. सामना रद्द झाल्यास भारताचे ३ गुण होतील तर बांगलादेशच्या खात्यात एक १ गुण जमा होईल.
हेही वाचा – Wes vs USA T20 World Cup: दणदणीत विजयासह वेस्ट इंडिजने रनरेट केला मजबूत; सुपर८ साठी पायाभरणी
या सामन्यात बांगलादेशच्या संघाने उलटफेर घडवून आणण्यात यश मिळवले, तरीही टीम इंडियाला शेवटचा साखळी सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. भारताला आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियासोबत खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १-१ सामना जिंकला आहे. जर भारत बांगलादेशविरुद्ध हरला आणि ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत केले, तर तो उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तसेच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास उपांत्य फेरीत जाणारा संघ नेट रनरेटच्या आधारे निश्चित होईल.