India vs England Highlights Updates, T20 World Cup 2022 Semi Final 2: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी ‌(१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळाचा जोरावर भारताचा तब्बल १० गडी राखून दारूण पराभव करत अंतिम फेरीत जागा निश्चित केली.‌ यासह भारतीय संघाचे दुसऱ्यांदा टी२० विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले.

प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.‌ राहुल केवळ पाच धावा काढून माघारी परतला. कर्णधार रोहित जम बसल्यानंतर २७ तर सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद झाले.‌ एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील चौथे अर्धशतक ठरले. तसेच यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने ५० धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण त्यावेळी संघाचा डाव सावरला तो कोहलीने. कारण यावेळी फक्त संघाला डाव सावरला नाही तर त्याने विश्वविक्रमही रचला. कोहलीने आता टी२० क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने हा विक्रम करत आपल्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक पंड्याने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने अखेरच्या तीन षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरच्या चेंडूवर हिट विकेट होण्याआधी ३३ चेंडूवर ६३ धावा केल्या. इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डन याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत होते. पण भारताला हा सामना गमवावा लागला. इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा दारूण पराभव केला. भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. अंतिम सामना हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे रंगणार आहे.

Live Updates

India vs England Highlights Score, T20 World Cup 2022 Semi Final 2 Updates: भारत विरुद्ध इंग्लंड हायलाइट्स स्कोअर अपडेट्स

16:23 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारतीय संघांची हाराकिरी

भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता येऊ नये ही फार मोठी नामुष्की आहे. टीम इंडिया दारूण पराभवाच्या छायेत दिसत आहे. इंग्लंडच्या १५० धावा पूर्ण झाल्या.

इंग्लंड १५०-०

16:21 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: कर्णधार जॉस बटलरने साजरे केले अर्धशतक

कर्णधार जॉस बटलरने साजरे केले अर्धशतक. इंग्लंड संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

इंग्लंड १४०-०

16:15 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: इंग्लंडच्या सलामीवीरांची शतकी भागीदारी

भारतीय गोलंदाजांची धुलाई करत इंग्लंडच्या सलामीवीरांची शतकी भागीदारी केली.

इंग्लंड ११२-०

15:54 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: अलेक्स हेल्सचे अर्धशतक

अलेक्स हेल्सचे शानदार अर्धशतक साजरे केले. तो सध्या ५१ धावांवर खेळत आहे.

इंग्लंड ८८-०

15:46 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: पॉवर प्ले मध्ये इंग्लंडची धुव्वाधार फलंदाजी

पॉवर प्ले मध्ये इंग्लंडच्या जॉस बटलर आणि अलेक्स हेल्स यांनी धुव्वाधार फलंदाजी केली.

दोघांनी ६३ धावांची सलामी भागीदारी केली.

इंग्लंड ६३-०

15:41 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारतीय संघांची खराब गोलंदाजी

भुवनेश्वर, अर्शदीप, शमी आणि अक्षर पटेल यांनी आतापर्यंतच्या खेळत या सामन्यात अतिशय खराब गोलंदाजी केली. आक्रमक फलंदाजी करत टीम इंडियावर दबाव निर्माण करण्यात हे दोघेही यशस्वी झाले आहेत.

इंग्लंड ५२-०

15:38 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: पॉवर प्ले मध्ये इंग्लंडची चांगली सुरुवात

सलामीवीर कर्णधार जॉस बटलर आणि अलेक्स हेल्स यांनी इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या चार षटकातच त्यांनी ४० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाला विकेट्सची गरज आहे.

इंग्लंड ४७-०

15:27 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: कर्णधार जॉस बटलरची धमाकेदार सुरुवात

भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्या षटकात बटलरने चार चौकार मारत दमदार सुरुवात केली.

इंग्लंड १९-०

15:17 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: इंग्लंडचे सलामीवीर मैदानात

१६९ धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स आणि कर्णधार जॉस बटलर मैदानात आले आहेत.

इंग्लंड ०-०

15:12 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारताचे इंग्लंडसमोर १६९ धावांचे आव्हान

विराट-हार्दिकच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर १६९ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतला अंतिम फेरी गाठण्यासाठी इंग्लंड संघाचे गडी लवकर बाद करणे आवश्यक आहे.

भारत १६८-६

https://twitter.com/BCCI/status/1590641120635392000?s=20&t=Oc36Yrse0X_w-QgKz_4b-w

15:08 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: हार्दिक पांड्या हिट-विकेट

हार्दिक पांड्या हिट-विकेट बाद झाला. त्याने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या. स्वतः तो स्टंप्सना धडकला. त्यामुळे तो बाद झाला आणि तो चौकार मारूनही भारताच्या खात्यात जमा झाला नाही.

भारत १६८-६

https://twitter.com/BCCI/status/1590639424362074112?s=20&t=Oc36Yrse0X_w-QgKz_4b-w

14:59 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: हार्दिक पांड्याचे अर्धशतक

हार्दिक पांड्याने तुफानी अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सध्या तो ५२ धावांवर खेळत आहे.

भारत १५६-४

https://twitter.com/BCCI/status/1590637481393029125?s=20&t=uMSNeO483Jtr4nNyh9zoSQ

14:52 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: विराट कोहली अर्धशतक करून बाद, भारताला चौथा धक्का

मोठे फटके मारण्याच्या नादात विराट कोहली बाद झाला. त्याने विश्वचषकातील चौथे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५० धावा ४० चेंडूत केल्या.

भारत १३६- ४

https://twitter.com/BCCI/status/1590635445276545024?s=20&t=CK3ACaE8evMx1TW2HkcHhA

14:50 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: हार्दिक पांड्याचे दोन षटकार

ख्रिस जॉर्डनच्या सलग दोन चेंडूवर हार्दिक पांड्याने दोन षटकार मारले. किमान १६० ते १७० धावा होणे आवश्यक होते. पण आता १५० आकडा जरी पार झाला तरी भारत यावर लढू शकतो असे मत हरभजनसिंग याने केले.

भारत १३६-३

14:42 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी

इंग्लंडच्या गोलंदाजांनी आज दमदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना चौकार आणि षटकार लहान मैदान असूनही मारू दिले नाही. म्हणूनचं अजूनही भारत तुलनेने मागे आहे.

भारत ११६-३

14:40 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: विराट कोहली थोडक्यात बचावला

ख्रिस जॉर्डनच्या यॉर्करवर कोहली खेळपट्टीवर कोसळला. रिव्ह्यूमध्ये तो नाबादतच राहिला पण दुसऱ्याच चेंडूवर त्याने शानदार चौकार मारला.

भारत १०९-३

14:35 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: शेवटचे पाच षटकात मोठ्या फटक्यांची गरज

भारताचे १०० धावा पूर्ण झाल्या असून किमान १७० धावा तरी होणे आवश्यक आहे. विराट कोहलीच्या ४००० धावा टी२० कारकिर्दीत पूर्ण झाल्या आहेत.

भारत १००-३

https://twitter.com/BCCI/status/1590631210275213312?s=20&t=diS2A75HbgU8TZsPV-UzbQ

14:28 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: युजवेंद्र चहलला संघात न घेणे पडू शकते महागात

लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल राशिदने शानदार लेगस्पिन करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले आणि बाद ही केले. त्यामुळे भारताला युजवेंद्र चहलला संघात न घेणे महागात पडू शकते.

भारत ८८-३

14:20 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारताला खूप मोठा धक्का, सूर्या बाद

भारतीय संघाला आदिल राशिद ने सूर्यकुमार यादवला १४ धावांवर बाद केले.

भारत ७५-३

https://twitter.com/BCCI/status/1590627838293553155?s=20&t=sewKe0D5DopJxzCG8hYm-Q

14:14 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: पहिल्या दहा षटकात भारताची धावा कमी

भारताने धावगती वाढवणे गरजेचे आहे. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. किमान १८० धावा करणे आवश्यक आहे.

भारत ६२-२

14:07 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा बाद

मोठा फटका मारण्याच्या नादात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याने २८ चेंडूत २७ धावा केल्या. त्याला ख्रिस जॉर्डनने बाद केले.

भारत ५६-२

https://twitter.com/BCCI/status/1590624356987678720?s=20&t=lGI8j5PRIjoBURLcsVrjLg

14:03 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारताचे ५० धावा पूर्ण, धावगती वाढवण्याची गरज

भारतीय संघांच्या ८ षटकात ५० धावा पूर्ण झाल्या असून आता धावगती वाढवण्याची गरज आहे. खासकरून रोहित शर्माला.

भारत ५१-१

13:56 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: पॉवर प्ले मध्ये भारताची सावध सुरुवात

दुसऱ्या षटकात केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

भारत ३८-१

13:52 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: रोहित शर्माला मिळाले जीवदान

एकापाठोपाठ एक दोन चौकार मारल्यानंतर रोहित शर्माचा झेल सुटला. सॅम करनच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूकने झेल सोडला.

भारत ३१-१

13:42 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: विराट कोहली बचावला

सॅम करनच्या गोलंदाजीवर विराट कोहली स्लीप मध्ये बचावला. मोईन अलीकडे एकटप्पा चेंडू गेला.

भारत ११-१

13:38 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारताला मोठा धक्का, राहुल बाद

भारतीय संघाला मोठा धक्का बसला. केएल राहुल ५ धावा करून बाद झाला. ख्रिस वोक्सने त्याला बाद केले.

भारत ९-१

https://twitter.com/BCCI/status/1590617226691768320?s=20&t=hW7Sp3y2wORbEKjB_9xgXw

13:31 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: टीम इंडियाची चौकाराने सुरुवात

भारतीय फलंदाजीची सुरुवात केएल राहुलने चौकाराने केली.

भारत ५-०

13:28 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारतीय संघांचे सलामीवीर मैदानात

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल फलंदाजी करण्यसाठी आले खेळपट्टीवर

भारत ०-०

13:26 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: राष्ट्रगीतासाठी मैदानात

India vs England T20 Semi-Final Highlights Cricket Score: भारत विरुद्ध इंग्लंड हायलाइट्स स्कोअर

टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताचा तब्बल १० गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.