India vs England Highlights Updates, T20 World Cup 2022 Semi Final 2: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी ‌(१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळाचा जोरावर भारताचा तब्बल १० गडी राखून दारूण पराभव करत अंतिम फेरीत जागा निश्चित केली.‌ यासह भारतीय संघाचे दुसऱ्यांदा टी२० विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.‌ राहुल केवळ पाच धावा काढून माघारी परतला. कर्णधार रोहित जम बसल्यानंतर २७ तर सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद झाले.‌ एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील चौथे अर्धशतक ठरले. तसेच यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने ५० धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण त्यावेळी संघाचा डाव सावरला तो कोहलीने. कारण यावेळी फक्त संघाला डाव सावरला नाही तर त्याने विश्वविक्रमही रचला. कोहलीने आता टी२० क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने हा विक्रम करत आपल्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक पंड्याने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने अखेरच्या तीन षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरच्या चेंडूवर हिट विकेट होण्याआधी ३३ चेंडूवर ६३ धावा केल्या. इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डन याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत होते. पण भारताला हा सामना गमवावा लागला. इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा दारूण पराभव केला. भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. अंतिम सामना हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे रंगणार आहे.

Live Updates

India vs England Highlights Score, T20 World Cup 2022 Semi Final 2 Updates: भारत विरुद्ध इंग्लंड हायलाइट्स स्कोअर अपडेट्स

13:10 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: टीम इंडिया प्लेईंग-११

भारतीय संघाने कोणताही बदल आजच्या सामन्यासाठी केलेला नाही. झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेला संघच कायम ठेवला आहे.

13:08 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: इंग्लंड प्लेईंग -११

जॉस बटलरने मार्क वूड आणि डेव्हिड मलान यांना दुखापतीमुळे आजचा सामना खेळता येणार नाही असे सांगितले. त्यांच्याऐवजी फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डन यांचा संघात समावेश करण्यात आला.

13:04 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: इंग्लंडने नाणेफेक जिंकली

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

13:00 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारताच्या राष्ट्रगीतावर खेळाडूंनी व्यक्त केल्या भावना

भारतीय संघांच्या खेळाडूंनी राष्ट्रगीताच्या वेळी अंगावर रोमांच उभे राहतात अशाप्रकारे भावना व्यक्त केल्या.

12:56 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे. “भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेईल. कारण टीम इंडिया धावांचा पाठलाग करताना नेहमी यशस्वी होते.” असे मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

12:38 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: पिच रिपोर्ट

या स्पर्धेसाठी गेल्या आठवड्यात तीन वेगवेगळ्या खेळपट्ट्या वापरल्या गेल्या आहेत. त्यातील न्यूझीलंड-आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामन्यासाठी ज्या खेळपट्ट्या वापरल्या गेल्या त्यावरच उपांत्य सामना होण्याची अपेक्षा आहे. खेळपट्टी थोडी स्लो झाली असून धावांचा पाठलाग करताना दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचण होऊ शकते. या खेळपट्टीवर दोन्ही देशांचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतील. १७० ते १९० ही धावसंख्या या मैदानाची सरासरी मानली जाते. मैदानाच्या दोन बाजू या लहान आहेत, त्यामुळे धावा या खूप होऊ शकतील अशी सुनील गावसकर यांनी पिच रिपोर्ट मध्ये माहिती दिली.

12:32 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: अर्शदीप-सूर्याकडून रवी शास्त्रींना अपेक्षा

भारत-इंग्लंड सामन्यात रवी शास्त्रींना विराट कोहली यांच्यासोबत आणखी दोन खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्यात त्यांनी सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग या दोघांची नावे घेतली.

12:24 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: भारतीय संघ ॲडलेड येथील ओव्हल मैदानात दाखल

संपूर्ण भारतीय संघ सामन्यासाठी ॲडलेड येथील ओव्हल मैदानात दाखल झाला आहे. मैदानात दाखल होण्यापूर्वी चाहत्यांनी त्यांच्या बसला गराडा घातला आणि इंडिया-इंडिया अशा घोषणा दिल्या.

12:20 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा

भारत वि. इंग्लंड सामन्यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी या दोघांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. चाहते देखील भारतीय संघांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. १५ वर्षाचा दुष्काळ भारतीय संघ संपवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

12:08 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: ॲडलेड ओव्हलवर चाहत्यांचा उत्साह शिगेला

भारत-इंग्लंड सामन्याआधी टीम इंडियाच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. देशभक्तीचे वेगवेगळे गाणे ते गात आहेत. टीम इंडियाचे दुसरे होमग्राउंड ॲडलेड झाले आहेत. 'जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा' असे नारे देत आहेत.

11:40 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाची तयारी पूर्ण

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध सगळी तयारी पूर्ण केली आहे. सर्व प्रकारचे प्लान्स कर्णधार रोहितने तयार ठेवले. टीम इंडियाने सामन्याआधी कसून सराव देखील केला आहे.

11:38 (IST) 10 Nov 2022
IND vs ENG: फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज

'हम हे तय्यार!' असे म्हणत रोहित सेना आज टी२० विश्वचषक २०२२ मधील उपांत्य फेरीतील दुसरा सामन्यात आज भारत इंग्लंडशी दोन हात करणार आहे. फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

India vs England T20 Semi-Final Highlights Cricket Score: भारत विरुद्ध इंग्लंड हायलाइट्स स्कोअर

टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताचा तब्बल १० गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.