इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत संघाला १६८ ची धावसंख्या उभारण्यास मदत केली. इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात पंड्याने मोलाची भूमिका बजावली. अवघ्या ३३ चेडूंमध्ये ६३ धावा केल्या. यामध्ये त्याने चार चौकार आणि पाच षटकार लगावले. या सामन्यातील शेवटच्या षटकामध्ये ऋषभ पंतने पंड्यासाठी स्वत:चा बळी दिला. पंड्या धावबाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे पंतने क्रीज सोडली आपली विकेट गमावली.
नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर
झालं असं की १९ व्या षटकामध्ये पंड्याने तुफान फटकेबाजी करत २० धावा काढल्या. पुढल्या षटकामध्ये ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर पंतने एक धाव काढली. पुढल्या चेंडूवर पंड्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही एकच धाव घेता आली. षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंतच्या बॅटला चेंडू न लागता थेट विकेटकिपरकडे गेला. मात्र नॉन स्ट्राइकर एण्डला असलेल्या पंड्याने क्रीज सोडली होती. दरम्यान बटलरने गोलंदाजाकडे थ्रो केला. त्यामुळेच सेट बॅट्समन असलेल्या पंड्याला शेवटचे तीन चेंडू खेळता यावे म्हणून पंतने धावबाद होण्याचा निर्णय घेतला. धावबाद झाल्याने नियमानुसार पंड्या फलंदाजीला आला.
नक्की वाचा >> Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”
पंड्याला फलंदाजीसाठी मिळालेल्या तीन चेंडूंमध्ये त्याने १० धावा केल्या. यामध्ये एक षटकार आणि एक चौकार समाविष्ट आहे. शेवटच्या चेंडूलाही पंड्याने चौकार लगावला मात्र पाय स्टम्पला लागून बेल्स पडल्याने पंड्याला हीटविकेट घोषित करण्यात आलं आणि शेवटच्या चार धावा भारताला मिळाल्या नाहीत.
१)
२)
पंतने पंड्यासाठी बाद होण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतने बाद झाल्यानंतर हार्दिककडे पाहून त्याला थम्बस दाखवत तू खेळ असा इशारा दिला. यासाठी पंतचं कौतुक होत आहे.
१)
२)
३)
४)
५)
पंत चार चेंडूंमध्ये सहा धावा करुन बाद झाला.