इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने १६८ धावांपर्यंत मजल मारली. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी करत संघाला १६८ ची धावसंख्या उभारण्यास मदत केली. इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात पंड्याने मोलाची भूमिका बजावली. अवघ्या ३३ चेडूंमध्ये ६३ धावा केल्या. यामध्ये त्याने चार चौकार आणि पाच षटकार लगावले. या सामन्यातील शेवटच्या चेंडू हा भारतीय संघासाठी जणू अ‍ॅक्लायमॅक्ससारखी ठरली. शेवटच्या चेंडूवर पंड्याचा चेंडू सीमेपार चौकार गेला मात्र पंड्याला बाद घोषित करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> Ind vs Eng: ६ धावा करणाऱ्या पंतच्या एका निर्णयानं भारताला मिळाल्या १० धावा, सर्वांकडून होतंय कौतुक; पाहा Video

झालं असं की पंड्याने शेवटच्या दोन षटकांमध्ये सुरेख फटकेबाजी केली. १९ व्या षटकामध्ये पंड्याने तुफान फटकेबाजी करत २० धावा काढल्या. पुढल्या षटकामध्ये ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर पंतने एक धाव काढली. पुढल्या चेंडूवर पंड्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही एकच धाव घेता आली. या पुढल्या चेंडूवर पंत धावबाद झाला पण पंड्या स्ट्राइकर्स एण्डला आला.

नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर

शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पंतने उत्तुंग षटकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर पंतने एका टप्प्याच सीमारेषा गाठणारा सुंदर फटका मारला. सामन्यातील अखेरच्या चेंडूवर पंतने बॅकफूटवर जात लेग साईटला पुलचा शॉट मारला. चेंडू गॅपमधून सीमारेषाही पार करुन चौकार गेला. मात्र पंड्याला बाद घोषित करण्यात आलं कारण हा फटका मारताना त्याचा उजवा पाय ऑफ स्टॅम्पला लागल्याने स्टॅम्पवरील बेल्स खाली पडल्या होत्या. पंड्या हिट विकेट पद्धतीने बाद झाला. पंड्या शेवटच्या चेंडूवर अशापद्धतीने बाद झाल्याने पत्नी नताशीही आधी गोंधळल्याचं अन् नेमकं काय झालं हे समजल्यानंतर हळहळल्याचं चित्र दिसून आलं.

नक्की वाचा >> Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”

पंड्याचा पाय स्टम्पला लागला नसता तर भारताची धावसंख्या १७२ पर्यंत पोहोचली असतील.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 2nd semi final video hardik pandya hit wicket wife natasha reaction goes viral scsg
Show comments