IND vs ENG Highlights, T20 World Cup 2024: पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत गतविजेत्या इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशा प्रकारे भारतीय संघाने १० वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता शनिवारी संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि आता विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी असेल.

Live Updates

T20 World Cup 2024, India vs England Semi Final 2 Highlights : टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघ २४ वेळा भिडले आहेत, ज्यात भारताचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने १३ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ११ सामन्यात विजयाची चव चाखली आहे.

01:44 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : उपांत्य फेरीत भारताचा दणदणीत विजय, अक्षर-कुलदीपच्या फिरकीपुढे इंग्लंडने टेकले गुडघे

कर्णधार रोहित शर्माच्या शानदार खेळीनंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता शनिवारी विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने १० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने याआधी २०१४ मध्ये टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना तिसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी २००७ आणि २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने २००७ मध्ये जेतेपद पटकावले होते, तर २०१४ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्यामुळे भारताने स्पर्धेतील विजयी मोहीम सुरू ठेवली. आता अंतिम फेरीत त्याचा सामना अशा संघाशी होईल जो पहिल्यांदाच विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे. त्याबरोबर तो ही या स्पर्धेत अजेय राहिला आहे.

01:29 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : भारतीय संघ विजयापासून एक विकेट दूर

अक्षर पटेलच्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन धावबाद झाला. अक्षरच्या चेंडूवर आर्चरने शॉट खेळला आणि लिव्हिंगस्टोन धाव घेण्यासाठी धावला, पण आर्चर आपल्या जागेवरून हलला नाही आणि अक्षर लिव्हिंगस्टोनला धावबाद झाला. लिव्हिंगस्टोन 16 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. यानंतर इंग्लंडने 16 व्या षटकात 88 धावांवर 9वी विकेट गमावली आहे. आदिल रशीद दोन चेंडूंत दोन धावा करून धावबाद झाला. भारताने जवळपास अंतिम फेरी गाठली आहे. येथून भारत अंतिम फेरीत जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

01:16 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : कुलदीपला तिसरे यश मिळाले

कुलदीपला तिसरे यश मिळाले

मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पुन्हा एकदा आपल्या शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ख्रिस जॉर्डनला बाद करून भारताला सातवे यश मिळवून दिले. पाच चेंडूत एक धाव घेत बाद झालेल्या जॉर्डनला कुलदीपने एलबीडब्ल्यू आऊट केले.

01:12 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : ब्रूक पॅव्हेलियनमध्ये परतला

ब्रूक पॅव्हेलियनमध्ये परतला

फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला सहावा धक्का दिला. हॅरी ब्रूकला बाद करत कुलदीपने भारताला आणखी एक यश मिळवून दिले. ब्रूक 19 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. ब्रूक बाद झाल्यानंतर ख्रिस जॉर्डन क्रीझवर आला असून त्याच्यासोबत लियाम लिव्हिंगस्टोनही उपस्थित आहे. इंग्लंडने 11 षटकं संपल्यानंतर 6 बाद 68 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी 54 चेंडूत 104 धावा करायच्या आहेत.

01:09 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : रवींद्र जडेजाच्या षटकात आल्या ९ धावा

10 षटकांत इंग्लंडची धावसंख्या 5 विकेटवर 62 धावा आहे. रवींद्र जडेजाने 10 वे षटक टाकले. यामध्ये एकूण 9 धावा झाल्या. हॅरी ब्रूक 15 चेंडूत 19 धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार मारले आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन पाच चेंडूत तीन धावांवर खेळत आहे.

00:59 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

इंग्लंडला 49 धावांवर पाचवा धक्का बसला. कुलदीप यादवने सॅम कुरनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला दोन धावा करता आल्या. सध्या हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन क्रीजवर आहेत. भारतीय फिरकीपटूंनी कहर केला आहे. अक्षरने तीन विकेट्स घेतल्या आहेत. तर, कुलदीपला यश मिळाले आहे. बुमराहने एक विकेट घेतली आहे.

00:54 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : मोईन अलीही पॅव्हेलियनमध्ये परतला

मोईन अलीही पॅव्हेलियनमध्ये परतला

इंग्लंडने 8व्या षटकात 46 धावांत 4 विकेट गमावल्या आहेत. अक्षर पटेलने मोईन अलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता इंग्लंडच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. इंग्लंडची धावसंख्या 8 षटकांत 4 गडी बाद 49 धावा. हॅरी ब्रूक आणि सॅम करन क्रीजवर आहेत.

00:46 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : इंग्लंडला तिसरा धक्का

इंग्लंडला तिसरा धक्का

इंग्लंडला 35 धावांवर तिसरा धक्का बसला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात म्हणजेच सहाव्या षटकात अक्षर पटेलने जॉनी बेअरस्टोला बोल्ड केले. बेअरस्टो खातेही उघडू शकला नाही. अक्षरचे हे दुसरे यश ठरले. यापूर्वी त्याने कर्णधार जोस बटलरला (23) बाद केले होते. त्याचवेळी बुमराहने फिल सॉल्टला क्लीन बोल्ड केले होते.

00:41 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : जसप्रीत बुमराहने इंग्लंडला दिला दुसरा धक्का, बटलरनंतर फिल सॉल्ट पॅव्हेलियनमध्ये परतला

इंग्लंडची दुसरी विकेट पाचव्या षटकात 34 च्या एकूण धावसंख्येवर पडली. जसप्रीत बुमराहने फिल सॉल्टला बाद केले. त्याला आठ चेंडूत केवळ पाच धावा करता आल्या. इंग्लंडला विजयासाठी 92 चेंडूत अजून 138 धावा करायच्या आहेत.

00:37 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : IND vs ENG Semi Final 2 :

इंग्लंडला पहिला धक्का

चौथ्या षटकात 26 धावांवर इंग्लंडला पहिला धक्का बसला. अक्षर पटेलने कर्णधार जोस बटलरला यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केले. तो 15 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला. सध्या फिल सॉल्ट आणि मोईन अली क्रीजवर आहेत. चार षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या एका विकेटवर 33 धावा आहे.

00:28 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : दोन षटकानंतर इंग्लंडचा स्कोअर १३/०

इंग्लंडचा स्कोअर 13/0

जसप्रीत बुमराहने दुसरे षटक टाकले. या षटकात एका चौकारासह एकूण आठ धावा आल्या. 2 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या एकही विकेट न गमावता 13 धावा आहे. जोस बटलर आठ चेंडूत 10 धावांवर खेळत आहे. तर फिल सॉल्ट चार चेंडूत दोन धावांवर आहे.

00:25 (IST) 28 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : भारताने इंग्लंडला दिले १७२ धावांचे लक्ष्य, रोहितचे अर्धशतक, जॉर्डनची हुकली हॅट्ट्रिक

भारताने 171 धावा केल्या

भारताने इंग्लंडसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात गडी गमावून 171 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर, सूर्यकुमार यादवने 47 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन बळी घेतले. मात्र, भारतीय डावाच्या 18व्या षटकात जॉर्डनची हॅट्ट्रिक हुकली. त्याने सलग दोन चेंडूंवर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांना बाद केले होते. जॉर्डनने या टी-20 विश्वचषकात आधीच हॅट्ट्रिक घेतली आहे.

23:44 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : भारताला चौथा धक्का

भारताला चौथा धक्का

124 धावांवर भारताला चौथा धक्का बसला. 16व्या षटकात जोफ्रा आर्चरने सूर्यकुमार यादवला ख्रिस जॉर्डनकरवी झेलबाद केले. तो 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला आणि त्याचे अर्धशतक हुकले. तत्पूर्वी, कर्णधार रोहित 57 धावा करून बाद झाला. 16 षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा आहे. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत.

23:36 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : रशीदने रोहितला केले बाद

रशीदने रोहितला बाद केले

भारताला तिसरा धक्का १४व्या षटकात ११३ धावांवर बसला. आदिल रशीदने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. तो 39 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 57 धावा करून बाद झाला. त्याने सूर्यकुमारसोबत 73 धावांची भागीदारी केली. सध्या हार्दिक पंड्या सूर्याला पाठिंबा देण्यासाठी आला आहे.

23:31 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : रोहितने षटकार ठोकून पूर्ण केले अर्धशतक, सूर्यकुमारसह सावरला टीम इंडियाचा डाव

रोहितने षटकारासह अर्धशतक पूर्ण केले

रोहितने 13व्या षटकात सॅम कुरनच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 32 वे अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावांची इनिंग खेळली होती. रोहितला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 36 चेंडू लागले. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 110 धावा आहे. सध्या रोहित 37 चेंडूत 56 धावा करून क्रीजवर आहे आणि सूर्यकुमार 26 चेंडूत 39 धावा करून क्रीजवर आहे.

23:15 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : पाऊस थांबल्याने सामन्याला पुन्हा सुरुवात

सामना पुन्हा सुरू झाला आहे. भारताने आठ षटकांत दोन बाद 65 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सूर्यकुमार 13 धावा करून क्रीजवर असून रोहितने 36 धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने नववे षटक टाकले.

22:53 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : पंच मैदानाची पाहणी करत आहेत

पंच मैदानाची पाहणी करत आहेत

मैदानाची पाहणी करण्यासाठी पंच दाखल झाले आहेत. मैदान कोरडे करण्यासाठी ग्राउंड स्टाफ मेहनत करताना दिसत आहे. सध्या सूर्य तळपत असून काही वेळात पुन्हा सामना सुरू होऊ शकतो.

22:29 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : पाऊस थांबला असून थोड्याच वेळात सामन्याला पुन्हा सुरुवात होणार

पाऊस थांबला

पाऊस पुन्हा एकदा थांबला आहे. मैदानाची पाहणी करण्यासाठी पंच दाखल झाले आहेत. ग्राउंड्समनही कव्हर्स काढताना दिसत आहेत. मात्र, आऊटफील्ड ओले दिसते. त्याचबरोबर कव्हर्सवरही भरपूर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागेल. पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दोन गडी बाद 65 धावा केल्या होत्या. सध्या रोहित आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत.

21:58 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 :पावसामुळे सामना थांबला

पावसामुळे सामना थांबला

पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला तोपर्यंत टीम इंडियाने दोन गडी गमावून ६५ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 26 चेंडूत 37 धावा करून क्रीजवर आहे आणि सूर्यकुमार यादव सात चेंडूत 13 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे. विराट कोहली नऊ धावा करून बाद झाला तर ऋषभ पंत चार धावा करून बाद झाला. कोहलीला टोपलीने क्लीन बोल्ड केले, तर पंतला सॅम करनने बेअरस्टोच्या हाती झेलबाद केले.

21:51 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : रोहितचा आक्रमक फॉर्म कायम

रोहितचा आक्रमक फॉर्म कायम

पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने दोन विकेट गमावल्या असल्या तरी कर्णधार रोहित शर्माचा आक्रमक फॉर्म कायम आहे. रोहितने आदिल रशीदच्या सातव्या षटकात दोन चौकार मारले. हिटमॅन आता 23 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 35 धावांवर आहे. 7 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा आहे.

21:45 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : टीम इंडियाला दुसरा धक्का, विराटनंतर ऋषभ पंतही पॅव्हेलियनमध्ये परतला

भारताला दुसरा धक्का

सहाव्या षटकात 40 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. सॅम करनने ऋषभ पंतला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. त्याला चार धावा करता आल्या. सध्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत. टीम इंडियाची धावसंख्या दोन विकेट्सवर 46 धावा आहे. रोहित 26 धावा करून क्रीजवर आहे तर सूर्यकुमारने पाच धावा केल्या आहेत.

21:39 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : ४ षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या एक बाद २९ धावा

4 षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या एक बाद २९ धावा

4 षटकात टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर 29 धावा झाली आहे. रोहित शर्मा 13 चेंडूत 16 धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंत दोन चेंडूत दोन धावांवर खेळत आहे. याआधी विराट कोहली 9 चेंडूत 9 धावा करून बाद झाला होता.

21:30 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का, विराट कोहली पुन्हा ठरला अपयशी

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का तिसऱ्या षटकात १९ धावांवर बसला. रीस टोपलीने विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. या संपूर्ण स्पर्धेत ओपनिंग करताना विराटचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. विराटने नऊ चेंडूत नऊ धावा केल्या. सध्या कर्णधार रोहित शर्माला पाठिंबा देण्यासाठी ऋषभ पंत आला आहे.

21:24 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : विराट-रोहितकडून टीम इंडियाच्या डावाला सुरुवात

उपांत्य फेरीचा सामना सुरू झाला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. इंग्लंडसाठी रीस टोपलीने पहिले षटक टाकले. पहिल्याच षटकात सहा धावा झाल्या. भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे. गोलंदाजांना स्विंग मिळत आहे.

21:04 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.पाह

21:01 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : जोस बटलरने नाणेफेक जिंकली

जोस बटलरने नाणेफेक जिंकली

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. इंग्लंडने कोणताही बदल केलेला नाही. ती तिच्या याच टीमसोबत उतरली आहे. त्याचबरोबर भारतानेही कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडियानेही याच टीमसोबत प्रवेश केला आहे.

20:51 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : नाणेफेक आणि सामना सुरू होण्याची नवीन अपडेट्स

नाणेफेक आणि सामना सुरू होण्याची वेळ

नाणेफेक भारतीय वेळेनुसार रात्री 8.50 वाजता होईल. त्याच वेळी, पहिला चेंडू साडेनऊ वाजता टाकला जाईल. मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या गयानमध्ये सूर्यप्रकाश आहे आणि आकाशही निरभ्र आहे. चाहत्यांना पूर्ण सामन्याची अपेक्षा असेल.

20:21 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 :साडेआठ वाजता होणार मैदानाची पाहणी

साडेआठ वाजता होणार मैदानाची पाहणी

भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता पंच मैदानाची पाहणी करतील. गयानामध्ये सध्या ऊन असून भारतीय खेळाडू फुटबॉल खेळताना दिसत आहेत. विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि युझवेंद्र चहल फुटबॉलचा आनंद लुटत आहेत. मैदानाची पाहणी केल्यानंतरच पंच नाणेफेकीचा निर्णय घेतील. सध्या मैदानातून कव्हर्स काढण्यात आली आहेत.

19:59 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : भारत-इंग्लंड सामन्यासाठी नियम पूर्णपणे वेगळे

भारत-इंग्लंड सामन्यासाठी नियम पूर्णपणे वेगळे

गयानामध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. कधी सूर्य बाहेर येतो तर कधी मुसळधार पाऊस सुरू होतो. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 पर्यंत हा सामना 10-10 षटकांचा खेळवला जाऊ शकतो. पावसामुळे सामना रद्द झाला, तर सुपर-8 मध्ये चांगल्या नेट रनरेटमुळे भारत अंतिम फेरीत पोहोचेल.

19:24 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : कव्हर्स अजूनही मैदानात

कव्हर्स अजूनही मैदानात आहेत –

कव्हर्स काढल्यानंतरही पाऊस पडला आणि खेळपट्टी पुन्हा कव्हर्सने झाकली गेली. ढग अजूनही मैदानावर घिरट्या घालत आहेत. मात्र, सध्या पाऊस पडत नाही. चाहते अद्याप स्टेडियममध्ये पोहोचलेले नाहीत. केवळ ग्राउंड स्टाफ मैदान कोरडे करण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे. भारत आणि इंग्लंडचे खेळाडू निश्चितपणे स्टेडियमवर पोहोचले आहेत.

T20 WC 2024 IND vs ENG Semi Final 2 Highlights : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी भारतीय संघाने तीम सामने जिंकले असून इंग्लंडने दोन सामन्यात बाजी मारली आहे.