IND vs ENG Highlights, T20 World Cup 2024: पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत गतविजेत्या इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशा प्रकारे भारतीय संघाने १० वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता शनिवारी संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि आता विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी असेल.

Live Updates

T20 World Cup 2024, India vs England Semi Final 2 Highlights : टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघ २४ वेळा भिडले आहेत, ज्यात भारताचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने १३ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ११ सामन्यात विजयाची चव चाखली आहे.

18:52 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : भारतीय खेळाडू मैदानात पोहोचले

पाऊस थांबला असून भारतीय खेळाडू मैदानात पोहोचले आहेत आणि खेळपट्टीचा आढावा घेत आहेत. कव्हर काढण्यात आले असून खेळाडू मैदानावर फिरताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत प्रसारकांनी जारी केला आहे.

18:33 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : रोहित शर्मा आणखी एक फिरकीपटू खेळवणार का?

भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल न करता जाण्याची अपेक्षा आहे, परंतु संघ व्यवस्थापनाने संघात चार फिरकीपटू का ठेवले आहेत याबद्दल रोहित शर्माच्या मागील टिप्पण्यांबद्दल अद्याप काही तर्क आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहलचा संघात समावेश करण्याचा विचार करणार का? असे झाल्यास फिंगर स्पिनर किंवा वेगवान गोलंदाज बाहेर होऊ शकतो. ओपनिंग कॉम्बिनेशनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

18:17 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

या सामन्यात भारताला पुन्हा एकदा रोहित शर्माकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट जोरात गर्जली. त्याने ९२ धावांची झंझावाती खेळी खेळून स्टार्क आणि पॅट कमिन्सचा खरपूस समाचार घेतला. इंग्लंडविरुद्धही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, स्टार फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. चालू स्पर्धेत आतापर्यंत त्याला केवळ ६६ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

18:00 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : दिनेश कार्तिकने गयानातील हवामानाबद्दल दिली अपडेट

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक दिनेश कार्तिकने त्याच्या एक्सवर पोस्ट केले. त्यांनी लिहिले सध्या परिस्थिती फारशी चांगली नाही. आम्ही वाटेत असताना मुसळधार पाऊस पडला आणि आता रिमझिम पाऊस पडत आहे. पण चांगली बातमी अशी आहे की सूर्य बाहेर डोकावत आहे.

17:32 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला फायदा होणार?

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला फायदा होणार?

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला, तर त्याचा फायदा भारतीय संघाला होईल. वास्तविक, भारताने ग्रुप स्टेज आणि सुपर-८ मधील सर्व सामने जिंकले आहेत. सुपर-८ मध्ये भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यांच्या खात्यात सहा गुण आहेत तर इंग्लंडच्या खात्यात चार गुण आहेत. या आधारावर भारत अंतिम फेरीसाठी सहज पात्र ठरेल.

17:10 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : भारत मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज

उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात भारताची नजर इंग्लंडविरुद्धच्या मागील पराभवाचा बदला घेण्याकडे असेल. खरं तर, टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये, इंग्लिश संघाने उपांत्य फेरीत भारताचा १० गडी राखून पराभव करून अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले होते. आता रोहित शर्मा आणि कंपनीला त्यांच्या भूतकाळातील चुकांमधून शिकून इंग्लंडला हरवायचे आहे.

16:46 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : हवामान कसे असेल?

तमाम क्रिकेट चाहते उपांत्य फेरीच्या सामन्याची वाट पाहत आहेत, पण गयानामधील हवामानामुळे हृदयाचे ठोके वाढले आहेत. सामन्यादरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. Weather.com च्या मते, गयानामध्ये सामन्याच्या दिवशी पावसाची ६० % शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण सामना होण्याची शक्यता कमी होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता खेळ सुरू झाल्यावर पावसाचा अंदाज ३३% ने सुरू होतो आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास ५९% पर्यंत पोहोचतो. त्यामुळे, हा सामना थांबवून -थांबवून खेळला जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे खेळाडू आणि चाहते दोघांचीही निराशा होऊ शकते.

16:40 (IST) 27 Jun 2024
IND vs ENG Semi Final 2 : टी-२० विश्वचषकात भारत-इंग्लंड चार वेळा आमनेसामने

बाद फेरीत भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जोस बटलरच्या सेनेचा सामना करताना दिसणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघ २३ वेळा भिडले आहेत, ज्यात भारताचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने १२ सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ११ सामन्यात विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडचा भारताशी चार वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.

T20 WC 2024 IND vs ENG Semi Final 2 Highlights : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी भारतीय संघाने तीम सामने जिंकले असून इंग्लंडने दोन सामन्यात बाजी मारली आहे.