रोहित शर्माच्या टीम इंडियाला गुरुवारी अॅडलेड येथे आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६८ धावा करत १६९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने हेल्स आणि बटलरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर १६ षटकांत बिनबाद १७० धावा केल्या. तसेच भारतीय संघाला १० विकेट्सने चिरडले आणि दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला.

यासह भारताने आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीतही खराब कामगिरी सुरू ठेवली आहे. २०१३ सालापासून भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. या दरम्यान भारतीय संघाने ४ उपांत्य फेरीचे आणि २ अंतिम फेरीचे सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नवा दक्षिण आफ्रिका उर्फ ​​चोकर्स आहे असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. २०१३ पासून दक्षिण आफ्रिकेला फक्त एका उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा

आयसीसी स्पर्धांच्या नॉकआउटमधील भारताची खराब कामगिरी –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०१४ अंतिम फेरी – श्रीलंकेविरुद्ध पराभूत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१५ उपांत्य फेरी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ उपांत्य फेरी – वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ अंतिम फेरी – पाकिस्तानविरुद्ध पराभूत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१९ उपांत्य फेरी – न्यूझीलंडकडून पराभूत
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२१ अंतिम फेरी – न्यूझीलंडविरुद्ध पराभूत
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ उपांत्य फेरी – इंग्लंडविरुद्ध पराभूत

हेही वाचा – T20 World Cup 2022 : हार्दिक पांड्याने तुफानी अर्धशतक झळकावत रचला इतिहास, युवराज सिंगचा मोडला ‘हा’ विक्रम

आयसीसी स्पर्धांच्या नॉकआउटमधील दक्षिण आफ्रिकेचा खराब कामगिरी –

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक १९९२ उपांत्य फेरी – इंग्लंडविरुद्ध पराभव
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक १९९६ उपांत्यपूर्व फेरी – वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक १९९९ उपांत्य फेरी – ऑस्ट्रेलियाकडून पराभव
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २००३ उपांत्य फेरी – श्रीलंकेविरुद्ध हरले
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २००७ उपांत्य फेरी – ऑस्ट्रेलियाकडून पराभव
आयसीसी टी-२० विश्वचषक २००९ उपांत्य फेरी – पाकिस्तानकडून पराभव
आयसीसी टी-२० विश्वचषक २०११ उपांत्य फेरी – न्यूझीलंडकडून पराभूत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१५ उपांत्य फेरी – न्यूझीलंडकडून पराभव