T20 World Cup 2022, IND vs NED Highlights Score Updates: आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होत असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात त्याने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-११ मध्ये कुठलाही बदल केला नाही. भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सची सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला.

गुरुवारी सिडनीमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावा करू शकला. सुपर-१२ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला. नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना टीम प्रिंगल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २० धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन एकरमन (१७), मॅक्स ओडौड (१६), बॅस डे लीड (१६) आणि पॉल व्हॅन मीकरन (१४) यांनीही दोन आकडी धावसंख्या करत संघाला विजयी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यांच्या व्यतिरिक्त नेदरलँड्सच्या एकही खेळाडूला दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही.

या विजयासह टीम इंडिया सुपर-१२ फेरीच्या ग्रुप-२ मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताचे दोन सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी पर्थमध्ये ३० ऑक्टोबरला होणार आहे.

भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराट कोहली ४४ चेंडूत ६२ धावा करून नाबाद राहिला आणि सूर्यकुमार यादव २५ चेंडूत ५१ धावा करून नाबाद राहिला. कोहलीने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमारने सात चौकार आणि एक षटकार लगावला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ९५ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या पाच षटकांत भारताने एकही विकेट न गमावता ६५ धावा केल्या. कोहली-सूर्याशिवाय रोहित शर्माने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचवेळी केएल राहुल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्याला १२ चेंडूत नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात राहुलला केवळ चार धावा करता आल्या होत्या.

Live Updates

India vs Netherlands T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध नेदरलँड्स टी२० विश्वचषक हायलाइट्स अपडेट्स

15:53 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: टीम इंडियाचा ५६ धावांनी विजय

भारताने नेदरलँड्सवर तब्बल ५६ धावांनी विजय मिळवला.

नेदरलँड्स १२३-९

15:45 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: अर्शदीपने एकाच षटकात नेदरलँड्सला दिले दोन धक्के

अर्शदीपने एकाच षटकात नेदरलँड्सला दिला एकापाठोपाठ एक असे दोन धक्के दिले.

फ्रेड क्लासेनला भोपळाही फोडता आला नाही.

नेदरलँड्स १०१-९

15:42 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: अर्शदीपला मिळाली पहिली विकेट

लोगन व्हॅन बीकला बाद करत अर्शदीपने आजच्या सामन्यात मिळवली पहिली विकेट. त्याने फक्त ३ धावा केल्या.

नेदरलँड्स १०१-८

15:36 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: नेदरलँड्सचा कर्णधार बाद

भुवनेश्वर कुमारने नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला बाद केले. त्याने अवघ्या ५ धावा केल्या.

नेदरलँड्स ८९-७

15:31 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: मोहम्मद शमीने दिला नेदरलँड्स सहावा धक्का

मोहम्मद शमीने टिम प्रिंगलला बाद केले. त्याने १५ चेंडूत २० धावा केल्या. या विकेट्सने नेदरलँड्सचा संघ सामन्यात खूप मागे आहे.

नेदरलँड्स ८७-६

15:23 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या डोक्याला लागला चेंडू

अर्शदीप सिंगच्या षटकात बाउन्सरवर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या डोक्याला चेंडू लागला लागला. त्याचे हेल्मेटचे ही थोडे नुकसान झाले.

नेदरलँड्स ७२-५

15:18 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: अश्विनचे एकापाठोपाठ एक धक्के

नेदरलँड्सला अश्विनने एकापाठोपाठ एक धक्के देत भारताला सामन्यात आणले. टॉम कूपरने १२ चेंडूत ९ धावा केल्या.

नेदरलँड्स ६३-५

https://twitter.com/BCCI/status/1585569049735725056?s=20&t=-jfmAGIY25u8PRUnjpasLA

15:16 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: अश्विनची शानदार गोलंदाजी, नेदरलँड्सला चौथा धक्का

कॉलिन अकरमन २१ चेंडूत १७ धावा केल्या. त्याला अक्षरने बाद केले. नेदरलँड्सचा संघ अडचणीत

नेदरलँड्स ६२-४

15:04 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: नेदरलँड्सला अक्षरने दिला तिसरा धक्का

अक्षरच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने झेल घेत नेदरलँड्सला तिसरा धक्का दिला. बास डी लीडेने १६ धावा केल्या.

नेदरलँड्स ४७-३

https://twitter.com/BCCI/status/1585565273737805830?s=20&t=yTL_egBr5LlXVIj1Ih2LzQ

15:00 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: स्टंपिंगची संधी हुकली

दिनेश कार्तिकने स्टंपिंगची संधी घालवली. अक्षर पटेलच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ही संधी होती.

नेदरलँड्स ४६-२

14:52 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: पहिल्या पॉवर प्ले मध्ये नेदरलँड्सची खराब सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले मध्ये नेदरलँड्सची खराब सुरुवात झाली असून त्यांनी दोन विकेट्स गमावल्या तसेच धावगती देखील कमी आहे.

नेदरलँड्स २७-२

14:46 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: अक्षर पटेल ने नेदरलँड्सला दिला दुसरा धक्का

अक्षर पटेल ने नेदरलँड्सला दिला दुसरा धक्का, मॅक्स ओ'डॉडने १६ धावा करत बाद झाला.

नेदरलँड्स २०-२

https://twitter.com/BCCI/status/1585560582375211009?s=20&t=ljLDCl67pWaoKFRtfRrImw

14:36 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: नेदरलँड्सला पहिला धक्का, विक्रम सिंग बाद

भुवनेश्वर कुमारने नेदरलँड्सला पहिला धक्का दिला आहे. विक्रम सिंग अवघी एक धाव काढून बाद

नेदरलँड्स-११-१

https://twitter.com/BCCI/status/1585558297872158727?s=20&t=dYYBFSRL8yMFx_Puz_bcSw

14:34 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: अर्शदीप सिंगच्या एका षटकात दोन चौकार

मॅक्स ओ'डॉडने अर्शदीप सिंगच्या षटकात दोन चौकार मारत नेदरलँड्सचे खाते उघडले.

नेदरलँड्स ११-०

14:29 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भुवनेश्वर कुमारचे निर्धाव षटक

विक्रम सिंग-मॅक्स ओ'डॉड हे पहिल्या षटकात एकही धाव करू शकले नाही.भुवनेश्वर कुमारचे निर्धाव षटक

नेदरलँड्स ०-०

14:25 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: नेदरलँड्सचे फलंदाज आले मैदानात

नेदरलँड्सचे फलंदाज १८० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आले.

नेदरलँड्स ०-०

14:13 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भारताने नेदरलँड्ससमोर १८० धावांचे ठेवले आव्हान

भारताने नेदरलँड्ससमोर १८० धावांचे आव्हान ठेवले आहेत. शेवटच्या दोन षटकात त्यांनी चांगली गोलंदाजी केली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत १७९ धावा केल्या. सुर्यकुमार यादवने ही आपले षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले.

भारत १७९-२

https://twitter.com/BCCI/status/1585552820505571328?s=20&t=iTNZqeVezMmNr48f9VdqRQ

14:04 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: टीम इडिया दीडशेपार

सुर्यकुमार यादवच्या चौकाराने भारतीय संघाच्या १५० धावा पूर्ण झाल्या आहेत.

भारत १५४-२

13:57 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: विराट- सुर्यकुमार यांच्यात अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. २६ चेंडूत ५१ धावांची भागीदारी झाली असून दोन्हीही फलंदाज मोठे फटके मारत आहे.

भारत १३५-२

13:53 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: सुर्यकुमार यादव-कोहली यांना धावगती वाढवण्याची गरज

सुर्यकुमार यादव एका बाजूने चौकार मारताना दिसत आहे. कोहलीने आता अजून चौकार मारण्याची गरज आहे.

भारत १२७-२

13:50 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: शेवटचे पाच षटके भारतासाठी महत्वाचे

१६० धावा तरी किमान झाल्या पाहिजेत हातात ८ विकेट्स असताना त्यामुळे शेवटचे पाच षटके महत्वाची आहेत.

भारत ११४-२

13:43 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भारताच्या १०० धावा पूर्ण

सुर्यकुमार यादवच्या शानदार चौकाराने भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण झाल्या. सूर्याने येताच त्याने चौकारांची बरसात करण्यास सुरुवात केली. यामुळे भारताची धावगती वाढण्यास मदत झाली.

१०५-२

13:35 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भारताला मोठा धक्का, रोहित बाद

रोहित शर्मा अर्धशतक करून बाद झाला. त्याने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याला फ्रेड क्लासेनने बाद केले.

भारत ८४-२

https://twitter.com/BCCI/status/1585543150117986304?s=20&t=D8kh6lDML85ZP7rpSDs16w

13:31 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: रोहित शर्माचे अर्धशतक

कर्णधार रोहित शर्माने ३५ चेंडूत अर्धशतक साजरे केले. ३६ चेंडूत ५२ धावा करून तो खेळत आहे. तो फॉर्म मध्ये आला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

भारत ७८-१

https://twitter.com/BCCI/status/1585541854317383681?s=20&t=VVjZTfnEhg_8PG3iJ4cT5Q

13:27 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: पहिल्या दहा षटकानंतर भारताला धावगती वाढवण्याची गरज

पहिल्या दहा षटकानंतर भारताला धावगती वाढवण्याची गरज आहे. खेळपट्टीवर चेंडू बॅटवर सहजरीत्या येत नाही आहे. खेळपट्टी खूप स्लो आहे.

भारत ६७-१

https://twitter.com/BCCI/status/1585540276650926080?s=20&t=PFP9VIeIPFd28TeBP0E5mQ

13:19 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: टीम इंडियाचे ५० धावा पूर्ण

टीम इंडियाचे ५० धावा पूर्ण झाल्या असून आता धावांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. भारतासाठी चांगली बाब म्हणजे रोहित आणि कोहली हे अजूनही खेळपट्टीवर टिकून आहेत.

भारत ५३-१

13:17 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: रोहित शर्माने घेतला रिव्हू

रोहित शर्माने घेतला रिव्हू घेतला आणि तो पायचीत होताना वाचला. सध्या ६ च्या धावगतीने भारत फलंदाजी करताना दिसत आहे.

भारत ४७-१

13:10 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: पॉवर प्ले मध्ये भारताची सावध सुरुवात

भारताने सामन्यात सावध सुरुवात केली असून एक विकेट ही गमावली आहे. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी अतिशय उत्तम सुरुवात केली.

भारत ३८-१

13:05 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: रोहित शर्माला मिळाले जीवदान, झेल सोडला

फ्रेड क्लासेनच्या गोलंदाजीवर टिम प्रिंगलने रोहित शर्माचा झेल सोडला. नेदरलँड्सची चांगली सुरुवात झाली आहे.

भारत ३१-१

India vs Netherlands T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध नेदरलँड्स टी२० विश्वचषक हायलाइट्स अपडेट्स

टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला.