T20 World Cup 2022, IND vs NED Highlights Score Updates: आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होत असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात त्याने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-११ मध्ये कुठलाही बदल केला नाही. भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सची सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी सिडनीमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेदरलँड्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावा करू शकला. सुपर-१२ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला. नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना टीम प्रिंगल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २० धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन एकरमन (१७), मॅक्स ओडौड (१६), बॅस डे लीड (१६) आणि पॉल व्हॅन मीकरन (१४) यांनीही दोन आकडी धावसंख्या करत संघाला विजयी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यांच्या व्यतिरिक्त नेदरलँड्सच्या एकही खेळाडूला दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही.

या विजयासह टीम इंडिया सुपर-१२ फेरीच्या ग्रुप-२ मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताचे दोन सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी पर्थमध्ये ३० ऑक्टोबरला होणार आहे.

भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराट कोहली ४४ चेंडूत ६२ धावा करून नाबाद राहिला आणि सूर्यकुमार यादव २५ चेंडूत ५१ धावा करून नाबाद राहिला. कोहलीने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमारने सात चौकार आणि एक षटकार लगावला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ९५ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या पाच षटकांत भारताने एकही विकेट न गमावता ६५ धावा केल्या. कोहली-सूर्याशिवाय रोहित शर्माने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचवेळी केएल राहुल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्याला १२ चेंडूत नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात राहुलला केवळ चार धावा करता आल्या होत्या.

Live Updates

India vs Netherlands T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध नेदरलँड्स टी२० विश्वचषक हायलाइट्स अपडेट्स

12:55 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: रोहित शर्माचा शानदार षटकार

केएल राहुल बाद होताच रोहित शर्माने सामन्याची सूत्रे हातात घेत शानदार षटकार मारला.

भारत १८-१

12:53 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भारताला पहिला धक्का, राहुल बाद

भारताची खराब सुरुवात केएल राहुल ९ धावांवर बाद झाला. त्याला पॉल व्हॅन मीकरेनने पायचीत केले.

भारत ११-१

12:43 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भारतीय सलामीवीर फलंदाज मैदानात

कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल भारतीय फलंदाज मैदानात आले. सामन्याला सुरुवात झाली आहे.

भारत १-०

12:35 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: राष्ट्रगीतासाठी सर्व खेळाडू मैदानात

राष्ट्रगीतासाठी सर्व खेळाडू मैदानात आले आहेत.

12:33 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: पिच रिपोर्ट

इरफान पठाण याने सांगितलेल्या पिच रिपोर्ट मध्ये १७० ते १९० धावा पहिले फलंदाजी करताना केल्या तर दुसऱ्या संघाला धावांचा पाठलाग करणं अवघड जाईल.

12:31 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: नेदरलँड्स प्लेईंग-११

नेदरलँड्स संघानेही संघात कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. मागील सामन्यातील जो संघ होता तोच या सामन्यात खेळणार आहे.

12:30 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: टीम इंडिया प्लेईन-११

रोहित शर्माने पाकिस्तान सामन्यात जो संघ खेळला होता त्यात कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही.

12:27 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भारताने नाणेफेक जिंकली

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

12:11 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: भारतासाठी खुशखबर! वेळेत सामना सुरु होणार

पावसामुळे सामना उशिरा सुरु होऊ शकतो असे वाटत होते पण आता सामना वेळेत सुरु होणार आहे. नाणेफेक ही वेळेत होणार आहे.

11:25 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: पावसामुळे नाणेफेक उशिरा होऊ शकते, सध्या पाऊस थांबला

पावसामुळे नानेफेकीस विलंब होऊ शकतो. पण सध्या तरी तशी चिन्ह दिसत नाहीत. कारण त्याच मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात ग्रुप बी मधील सामना सुरु आहे.

अधून-मधून मात्र पाऊस सामन्यात व्यत्यय आणू शकतो.

10:30 (IST) 27 Oct 2022
INDvsNED: आज टीम इंडिया भिडणार नेदरलँड्सशी

टी२० विश्वचषकात भारताचा दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला असून टीम इंडियाला नेदरलँड्सविरुद्ध मोठा विजय मिळवायचा आहे. या विजयाने भारत ग्रुपमध्ये पहिले स्थान कायम राखू शकतो.

टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला.