टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर के. एल. राहुल स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकवून देणाऱ्या विराट कोहलीने संयमी खेळी करत डावाला आकार दिला. मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवनं नेदरलँड्स गोलंदाजीची पिसं काढली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने १७९ धावा केल्या असून नेदरलँड्ससमोर १८० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या हाफमध्ये पहिला तास रोहित आणि विराटने गाजवला तर शेवटच्या षटकांमध्ये सूर्यकुमारच्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना पैसा वसूल फटकेबाजीचं दर्शन घडवलं.

नक्की वाचा >> Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..

१२ चेंडूंमध्ये ९ धावा करुन के. एल. राहुल पुन्हा एकदा स्वस्तात तंबूत परतला. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर राहुलला पॉल व्हॅन मिकरीनने पायचित केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या कोहलीने रोहितच्या सोबतीने भारतीय डावाला आकार दिला. ७२ धावांच्या भागीदारीमध्ये रोहितने संयमी अर्धशतक झळकावलं. रोहितने ३९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. १२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला. त्यानंतर कोहलीची सोबत करण्यासाठी मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्याचं सर्व वचपा काढल्यासारखं वाटावं अशी तुफान फलंदाजी केली.

नक्की पाहा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन

सूर्यकुमारने २५ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार लगावले. तर भारतीय इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर ४५ धावांवर खेळत असताना सूर्यकुमारने खणखणीत षटकार लगावत आपलं अर्धशतकं पूर्ण केलं. २०० हून अधिकच्या सरासरीने सूर्यकुमारने नेदरलँड्सच्या गोलंदाजींची धुलाई केली.

तिघांचेही अर्धशतक
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवबरोबरच तुफान फॉर्ममध्ये परतलेल्या विराट कोहलीनेही या सामन्यात अर्थशतकं झळकावलं. ४४ चेंडूंमध्ये ६६ धावांची खेळी करताना विराटने तीन चौकार आणि दोन उत्तम षटकारांचा नजराणा चाहत्यांसाठी पेश केला.

Story img Loader