टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर के. एल. राहुल स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकवून देणाऱ्या विराट कोहलीने संयमी खेळी करत डावाला आकार दिला. मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवनं नेदरलँड्स गोलंदाजीची पिसं काढली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने १७९ धावा केल्या असून नेदरलँड्ससमोर १८० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या हाफमध्ये पहिला तास रोहित आणि विराटने गाजवला तर शेवटच्या षटकांमध्ये सूर्यकुमारच्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना पैसा वसूल फटकेबाजीचं दर्शन घडवलं.
नक्की वाचा >> Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा